सिद्धिविनायकाच्या दागिन्यांचा लिलाव
By admin | Published: July 10, 2017 02:40 AM2017-07-10T02:40:49+5:302017-07-10T02:40:49+5:30
श्री सिद्धिविनायक न्यास समितीने भाविकांनी सिद्धिविनायकाच्या चरणी अर्पण केलेल्या अलंकारांचा लिलाव केला. लिलावाला भाविकांनी चांगला प्रतिसाद दिला.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंंबई : रविवारी गुरुपौर्णिमेचे निमित्त साधून प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक न्यास समितीने भाविकांनी सिद्धिविनायकाच्या चरणी अर्पण केलेल्या अलंकारांचा लिलाव केला. लिलावाला भाविकांनी चांगला प्रतिसाद दिला.
लिलावातून न्यासला ८ लाख ५९ हजार रुपये मिळाले. ५० ग्रॅम वजनाच्या २४ कॅरेट सोन्याच्या बिस्किटाला सर्वाधिक १ लाख ५३ हजार रुपयांची बोली लागली. न्यासकडून मिळालेल्या माहितीनुसार, या वर्षीचा हा दुसरा लिलाव होता. याअगोदर २८ एप्रिल रोजी अक्षय तृतीयेचा मुहूर्त साधत लिलावाचे आयोजन करण्यात आले होते. ७१ भाविकांनी श्रींचे दागिने खरेदी केले. श्रींचे एकूण ३७२ अलंकार या लिलावासाठी ठेवण्यात आले होते. त्यापैकी ७२ अलंकारांची विक्री रविवारी झाली. यापुढील लिलाव ८ आॅक्टोबर आणि १९ नोव्हेंबर रोजी होणार, अशी माहिती सिद्धिविनायक न्यास समितीने दिली आहे.