वसंतदादा कारखान्याच्या मालमत्तेचा लिलाव बारगळला

By admin | Published: October 26, 2016 08:28 PM2016-10-26T20:28:38+5:302016-10-26T20:28:38+5:30

शेतक-यांच्या उसाच्या ५२ कोटी थकीत बिल वसुलीसाठी वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या मालमत्तेच्या लिलावासाठी कोणाचीच बोली आली नसल्याने, लिलाव प्रक्रिया रद्द करण्यात आली.

Auction of properties of Vasantdada factory | वसंतदादा कारखान्याच्या मालमत्तेचा लिलाव बारगळला

वसंतदादा कारखान्याच्या मालमत्तेचा लिलाव बारगळला

Next

ऑनलाइन लोकमत
सांगली, दि. 26 - शेतक-यांच्या उसाच्या ५२ कोटी थकीत बिल वसुलीसाठी वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या मालमत्तेच्या लिलावासाठी कोणाचीच बोली आली नसल्याने, लिलाव प्रक्रिया रद्द करण्यात आली. मिरज तहसील कार्यालयात आयोजित लिलावात सहभागी झालेल्या एका खरेदीदाराने माघार घेतली. लिलाव रद्द झाल्याने कारखान्याच्या मालमत्तेच्या मालकी हक्कावर शासनाची नोंद करण्यात येणार आहे.
वसंतदादा साखर कारखान्याचे २०१३ व १४ च्या उसाचे बिल ४६ कोटी ३९ लाख रुपये व इतर थकीत देणी शेतकºयांना मिळालेली नसल्याने, साखर आयुक्तांनी कारखान्याची मालमत्ता जप्ती व विक्रीद्वारे रक्कम वसुली करून शेतकºयांची देणी देण्याचे आदेश दिले होते. १२ जुलै २०१४ रोजी महसूल विभागाने महसूल वसुली प्रक्रिया सुरू करून कारखान्याच्या मालमत्तेवर बोजा चढविण्याची कारवाई सुरू केली. मालमत्ता जप्तीच्या तीन नोटिसा बजावल्यानंतरही थकबाकीची रक्कम वसूल झाली नाही. त्यामुळे कारखाना मालमत्तेच्या लिलावाची अंतिम नोटीस बजावण्यात आली. ५२ कोटीपैकी केवळ दहा कोटी थकीत देणी असल्याने लिलाव रद्द करण्याची कारखाना व्यवस्थापनाची मागणी तहसीलदारांनी फेटाळली.
शेतकºयांच्या थकीत ५२ कोटी रुपये वसुलीसाठी कारखान्याची इमारत वगळता इतर मालमत्ता व जमिनीचा बुधवारी मिरज तहसील कार्यालयात लिलाव आयोजित करण्यात आला होता. लिलावास केवळ एका खरेदीदाराचा प्रतिसाद मिळाला. मात्र कारखाना मालमत्तेवर शेतकºयांच्या थकीत देण्याशिवाय बँका, केंद्रीय उत्पादन शुल्क विभाग, विक्रीकर विभागाच्या थकबाकीचा बोजा नोंद असल्याने, खरेदीदाराने बोली लावण्यास नकार दिला. लिलावास प्रतिसाद मिळाला नसल्याने, कारखाना मालमत्तेच्या सात-बारा उताºयावर मालक म्हणून शासनाची नोंद करण्यात येणार असल्याचे तहसीलदार शरद पाटील यांनी सांगितले.
  

Web Title: Auction of properties of Vasantdada factory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.