मराठवाड्यातील पाणी पुरवठा योजनांचे आॅडिट

By admin | Published: May 12, 2016 04:25 AM2016-05-12T04:25:50+5:302016-05-12T04:25:50+5:30

मराठवाड्यातील शहरी व ग्रामीण भागातील सर्वच म्हणजे १० हजार ६८५ पाणी पुरवठा योजनांचे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून आॅडिट करण्यात येणार आहे.

Audit of water supply schemes in Marathwada | मराठवाड्यातील पाणी पुरवठा योजनांचे आॅडिट

मराठवाड्यातील पाणी पुरवठा योजनांचे आॅडिट

Next

औरंगाबाद : मराठवाड्यातील शहरी व ग्रामीण भागातील सर्वच म्हणजे १० हजार ६८५ पाणी पुरवठा योजनांचे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून आॅडिट करण्यात येणार आहे. या योजनांचा मुख्यमंत्री पेयजल योजनेत समावेश करण्यात येणार असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगट यांनी दिली.
मराठवाड्यातील पाणी पुरवठा योजनांची अवस्था अत्यंत बिकट आहे. अनेक गावांत कोट्यवधी रुपये खर्च करून दोन ते तीन योजना राबविण्यात येऊनही पाणी पुरवठा सुरळीत नाही. अनेक ठिकाणी वितरण व्यवस्था खराब आहे. काही योजनांचे वीज बिल थकले आहे. गेल्या ३५ वर्षांपासून राबविण्यात आलेल्या योजनांचा गावनिहाय आढावा घेतला जात आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे दरडोई ४० लिटर पाणी देणाऱ्या योजनेत वाढ करणे गरजेचे झाले आहे. त्यामध्ये जि.प.च्या ग्रामीण पाणी पुरवठा योजना आणि जीवन प्राधिकरणामार्फत राबविण्यात आलेल्या योजनांचा समावेश आहे. पाणी योजनांचे आॅडिट करताना वितरण व्यवस्था, योजनांची दुरुस्ती, स्रोत बळकटीकरण, वीज बिल आदींची तपासणी होईल.
मराठवाड्यातील ७६ तालुक्यांत ६,६५६ ग्रामपंचायती व ८,३३५ गावे आहेत. गाव, वाड्या, वस्त्या मिळून ही संख्या १३ हजार ८२ आहे. त्यामध्ये १०,६८५ पाणी पुरवठा योजना राबविण्यात आल्या, पण त्या रखडल्या. (प्रतिनिधी)

Web Title: Audit of water supply schemes in Marathwada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.