मराठवाड्यात सुरू झाले पाणीपुरवठा योजनांचे आॅडिट

By admin | Published: June 19, 2016 12:47 AM2016-06-19T00:47:43+5:302016-06-19T00:47:43+5:30

मराठवाड्यातील शहरी व ग्रामीण भागात राबविण्यात आलेल्या पाणीपुरवठा योजना डबघाईस आल्या आहेत. अनेक गावांत तर, दोन ते तीन योजना राबवून देखील नागरिकांना सुरळीत पाणीपुरवठा होत

Audit of water supply schemes started in Marathwada | मराठवाड्यात सुरू झाले पाणीपुरवठा योजनांचे आॅडिट

मराठवाड्यात सुरू झाले पाणीपुरवठा योजनांचे आॅडिट

Next

- विकास राऊत, औरंगाबाद

मराठवाड्यातील शहरी व ग्रामीण भागात राबविण्यात आलेल्या पाणीपुरवठा योजना डबघाईस आल्या आहेत. अनेक गावांत तर, दोन ते तीन योजना राबवून देखील नागरिकांना सुरळीत पाणीपुरवठा होत नाही. कोट्यवधी रुपये खर्चून तयार करण्यात आलेल्या या योजनांची सद्य:स्थिती नाजूक असून, या योजनांचे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत आॅडिट सुरू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
सध्या मराठवाड्यातील ४ हजार गावांत ४ हजार टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहेत. मागील पाच वर्षांत पहिल्यांदाच जूनमध्ये टँकरच्या आकड्याने हा पल्ला गाठला आहे. गेल्या आठ महिन्यांत टँकरवर ३५० कोटी रुपये खर्च झाले आहेत. पण आता मराठवाड्यातील १० हजार ६८५ पाणीपुरवठा योजनांचे आॅडिट केले जात असून त्यांचा समावेश मुख्यमंत्री पेयजल योजनेत करण्यात येणार आहे. गेल्या ३५ वर्षांपासून राबविण्यात आलेल्या पाणीपुरवठा योजनांचा गावनिहाय आढावा घेण्यात येणार आहे. पाणी योजनांचे आॅडिट करताना वितरण व्यवस्था, योजनांची दुरुस्ती, स्रोत बळकटीकरण, वीज बिल आदींची तपासणी होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

योजना रखडण्याचे प्रमाण जास्त
मराठवाड्यातील ७६ तालुक्यांत ६ हजार ६५६ ग्रामपंचायती असून, ८ हजार ३३५ गावे आहेत. तर गाव, वाड्या, वस्त्या मिळून ही संख्या १३ हजार ८२ इतकी आहे.
या गावांमध्ये १० हजार ६८५ पाणीपुरवठा योजना राबविण्यात आल्या, पण त्या रखडल्या. २ हजार ३९७ गाव, वाड्या, वस्त्या पाणीपुरवठा योजनेपासून वंचित आहेत.
यावर्षी नादुरुस्त आणि बंद असलेल्या तसेच नव्याने घेण्यात आलेल्या ३८८ पाणीपुरवठा योजना पूर्ण करण्याचे उद्दिष्ट होते.

जिल्हा गावे/वाड्या पाणी योजनाशिल्लक
औरंगाबाद १९७३ १६४४ ०३२९
जालना १२९० ०९०३ ०३८७
परभणी १०७८ ०८६४ ०२१४
हिंगोली ०७३६ ०६४६००९०
नांदेड २१२० १६५४०४६६
उस्मानाबाद १२०१ १०२३ ०१७८
बीड ३४८८ २९७९ ०५०९
लातूर ११९६ ०९७२ ०२२४
एकूण १३०८२ १०६८५ २३९७

Web Title: Audit of water supply schemes started in Marathwada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.