१० ऑगस्ट रोजी राज्यातील पेट्रोल पंप चालकांचा संप
By Admin | Published: August 1, 2015 03:12 PM2015-08-01T15:12:59+5:302015-08-01T16:30:47+5:30
पेट्रोल-डिझेलवरील एलबीटी हटवण्याच्या मागणीसाठी पेट्रोलपंप चालकांनी १० ऑगस्ट रोजी राज्यव्यापी एकदिवसीय संप पुकारला आहे.
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १ - पेट्रोल-डिझेलवरील एलबीटी हटवण्याच्या मागणीसाठी पेट्रोलपंप चालकांनी १० ऑगस्ट रोजी एकदिवसीय संप पुकारला आहे. निवडणूकीपूर्वी भाजपा सरकारने पेट्रोल-डिझेलवरील एलबीटी व स्थानिक कर रद्द करण्याचे आश्वासन दिले होते, मात्र ते पूर्ण न झाल्याने हा राज्यव्यापी बंद पुकारण्यात आला आहे.
१० ऑगस्ट रोजी राज्यातील सर्व पेट्रोलपंप एक दिवसासाठी बंद ठेवण्यात असून ११ ऑगस्टपासून सकाळी ७ ते दुपारी ४ पर्यंतच पेट्रोल पंप सुरू राहतील, असे पेट्रोल पंप संघटनेचे प्रवक्ते सागर रुकारी यांनी सांगितले.