आॅगस्ट महिना पावसाचा
By admin | Published: August 2, 2015 03:11 AM2015-08-02T03:11:15+5:302015-08-02T03:11:15+5:30
जुन महिन्यांत पडलेल्या पावसाने जुलैमध्ये हात आखडता घेतला असला तरी पश्चिम बंगाल, राजस्थान आणि कर्नाटकवर झालेल्या वातावरणीय बदलामुळे आॅगस्ट महिन्याच्या सुरुवातीला देशभरात
मुंबई : जुन महिन्यांत पडलेल्या पावसाने जुलैमध्ये हात आखडता घेतला असला तरी पश्चिम बंगाल, राजस्थान आणि कर्नाटकवर झालेल्या वातावरणीय बदलामुळे आॅगस्ट महिन्याच्या सुरुवातीला देशभरात चांगला पाऊस होईल, असा अंदाज स्कायमेटने वर्तवला आहे.
जुलै महिन्याच्या अखेरीस देशभरातील हवामान प्रणाली कुमकुवत झाली. त्यामुळे पावसाचा जोर ओसरला. आॅगस्ट महिन्याच्या सुरुवातीला ही हवामान प्रणाली जोर धरणार आहे. त्यामुळे आॅगस्ट महिन्याच्या सुरुवातीला आणि शेवटी चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे. उत्तर भारतातील काही भाग, विशेषत: पंजाब, हरियाणा आणि दिल्ली आणि आजूबाजूच्या प्रदेशासह पूर्व भारतात पश्चिम बंगाल, ओरिसा व झारखंड येथेही चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे. महत्त्वाचे म्हणजे या प्रदेशातील काही भागात मुसळधार पाऊस पडेल, असा इशाराही स्कायमेटने दिला आहे.
सद्यस्थितीमध्ये पश्चिम बंगालवर निर्माण झालेल्या आणि तीव्रता
कमी झालेल्या ‘कोमेन’ या चक्रीवादळामुळे पूर्व भारतात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस होतो आहे. आता ही हवामान प्रणाली पश्चिमेकडे सरकण्याची चिन्हे आहेत. त्याचे रुपांतर कमी दाबाच्या क्षेत्रात
होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे संबधित ठिकाणी मध्यम स्वरुपाचा पाऊस होईल. (प्रतिनिधी)
वायव्य राजस्थान आणि लगतच्या भागावर असलेले कमी दाबाचे क्षेत्र आता मध्य पाकिस्तान व लगतच्या पश्चिम राजस्थानावर आहे. बांग्लादेशाच्या भागावर असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचा जोर कमी झाला आहे. मागील चोविस तासांत कोकणात मुसळधार पाऊस पडला आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला आहे. तर ३,४ आणि ५ आॅगस्ट रोजी कोकण, मध्य महाराष्ट्र व विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल, असा इशारा भारतीय हवामान शास्त्र विभागाने दिला आहे.