औरंगाबादच्या विमानतळाचा होणार विस्तार
By Admin | Published: November 16, 2016 05:25 AM2016-11-16T05:25:48+5:302016-11-16T05:25:48+5:30
औरंगााबाद येथील विमानतळाचा विस्तार करून त्या ठिकाणी सर्व प्रकारची प्रवासी व मालवाहू विमाने उतरण्याची सोय केली जाणार असून,
मुंबई : औरंगााबाद येथील विमानतळाचा विस्तार करून त्या ठिकाणी सर्व प्रकारची प्रवासी व मालवाहू विमाने उतरण्याची सोय केली जाणार असून, त्यासंदर्भात आज मंत्रालयात एक उच्चस्तरीय बैठक झाली.
सामान्य प्रशासन विभागाचे प्रधान सचिव श्यामलाल गोयल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला विमानतळ प्राधिकरणाचे अधिकारी, औरंगाबादचे विभागीय आयुक्त उमाकांत दांगट, औरंगाबादच्या जिल्हाधिकारी निधी पांडे आदी उपस्थित होते.
या विस्तारासाठी १८२ एकर जागा संपादित करण्यासंबंधीचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने सादर करावा, असे निर्देश गोयल यांनी आजच्या बैठकीमध्ये दिले. साबांविने विस्तारासाठी संपादित केलेल्या जमिनीच्या मोबदल्यापोटी जमीनधारकांना साडेबारा टक्के विकसित भूखंड अजूनही मिळालेले नाहीत. या विषयावर आजच्या बैठकीत चर्चा झाली. सिडकोप्रमाणे मोबदला सार्वजनिक बांधकाम विभागानेही द्यावा, अशी प्रकल्पग्रस्तांची मागणी आहे. या मागणीची पूर्तता करणारा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी लवकरच तयार करण्याचे आज ठरविण्यात आले. (विशेष प्रतिनिधी)