औरंगाबाद: शीतपेयातून विवाहितेला मद्य पाजून सामूहिक बलात्कार प्रकरणात आणखी एक आरोपी गजाआड
By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2017 02:07 PM2017-11-05T14:07:40+5:302017-11-05T18:20:53+5:30
शीतपेयातून विवाहितेला मद्य पाजून तिच्यावर सामूहिक अत्याचार करणा-या चौघांपैकी मुख्य आरोपी अनिल ठोंबरे यास ४ नोव्हेंबर रोजी अटक केल्यानंतर पोलिसांनी आज दुसरा आरोपी जगदीश ठोंबरे याच्या मुसक्या आवळल्या.
औरंगाबाद: शीतपेयातून विवाहितेला मद्य पाजून तिच्यावर सामुहिक अत्याचार करणा-या चौघांपैकी मुख्य आरोपी अनिल ठोंबरे यास ४ नोव्हेंबर रोजी अटक केल्यानंतर पोलिसांनी आज दुसरा आरोपी जगदीश ठोंबरे याच्या मुसक्या आवळल्या.
याविषयी अधिक माहिती देताना चिकलठाणा पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक सत्यजीत ताईतवाले यांनी सांगितले. २ नोव्हेंबर रोजी रात्री पीडितेला शितपेयातून मद्य पाजून चौघांनी तिच्यावर सामूहिक अत्याचार केले. या घटनेनंतर आरोपींनी तिला चिकलठाणा विमातनळासमोर आणून फे कून दिले होते. याप्रकरणी शनिवारी पहाटे आरोपींविरोधात चिकलठाणा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला. पीडितेने दिलेल्या जबाबानंतर पोलिसांनी मुख्य आरोपी अनिल ठोंबरे याला बेड्या ठोकल्या. अन्य नराधमांना पीडिता ओळखत नव्हती. यामुळे अनिल यास पकडल्यानंतर त्याच्याकडून पोलिसांनी अन्य आरोपींची नावे मिळविली आणि त्यांचा शोध सुरू केला. पकडल्या जाण्याच्या भितीपोटी आरोपींनी त्यांचे मोबाईल बंद केले. यामुळे त्यांना पकडणे पोलिसांना आव्हान होते. पोलिसांनी खबºयांना कामाला लावले आणि आरोपीच्या घरीही त्यांचा शोध घेतला, मात्र ते घरी सापडले नाही. आरोपीला मदत करणाºयांवरही कारवाई केली जाईल, असा सज्जड दमच त्यांनी संबंधितांना दिला. दरम्यान रविवारी सकाळी दुसरा आरोपी आडगाव शिवारात लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांच्या एका पथकाने त्याचा कसून शोध घेतला असता दुपारी १२ वाजेच्या सुमारास जगदीश ठोंबरे हा पोलिसांच्या हाती लागला. अन्य दोन आरोपीही लवकरच पोलिसांच्या हाती लागतील, असे सपोनि ताईतवाले यांनी सांगितले.