औरंगाबाद शस्त्रसाठा प्रकरणी अबु जुंदालसह ७ दोषींना मरेपर्यंत जन्मठेप

By admin | Published: August 2, 2016 12:31 PM2016-08-02T12:31:54+5:302016-08-02T12:39:16+5:30

औरंगाबादमध्ये २००६ मध्ये सापडलेल्या शस्त्रसाठाप्रकरणी मुंबईतील मोक्का न्यायालयाने अबू जुंदालसह ७ दोषींना मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली

Aurangabad arms case: Abu Jundal, seven others guilty of life imprisonment | औरंगाबाद शस्त्रसाठा प्रकरणी अबु जुंदालसह ७ दोषींना मरेपर्यंत जन्मठेप

औरंगाबाद शस्त्रसाठा प्रकरणी अबु जुंदालसह ७ दोषींना मरेपर्यंत जन्मठेप

Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई,  दि. २ - औरंगाबादमध्ये २००६ मध्ये सापडलेल्या शस्त्रसाठाप्रकरणी मुंबईतील मोक्का न्यायालयाने अबू जुंदालसह ७ दोषींना मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तसेच इतर २ आरोपींना १४ वर्षांच्या जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली असून आणखी तिघांना ८ वर्षांच्या जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. मात्र खटल्याच्या सुनावणीदरम्यान त्यांनी १० वर्ष तुरूंगात काढल्याने त्यांची सुटका होणार आहे.  मुंबईतील विशेष मोक्का न्यायालयाने मंगळवारी हा निर्णय सुनावला.
याप्रकरणी न्यायालयाने गेल्या महिन्यात (२८ जुलै) रोजी अबु जुंदालसह ११ आरोपींना दोषी ठरवले होते, अखेर आज त्यांना शिक्षा सुनावण्यात आली. या प्रकरणात एकूण २२ जणांना अटक झाली होती. त्यातील ११ आरोपी दोषी ठरले तर, १० जणांची सुटका झाली. 
 
लष्कर-ए-तय्यबाचा दहशतवादी अबु जुंदाल मुंबईवरील २६/११ दहशतवादी हल्ल्याच्या कटातील मुख्य सूत्रधार आहे. २००२ सालच्या गुजरात दंगलीनंतर गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आणि विश्व हिंदू परिषदेचे नेते प्रवीण तोगाडीया यांची हत्या करण्यासाठी हा कट रचला होता असे न्यायालयाने आपल्या निर्णयात म्हटले होत.  आरोपींवर मोक्कातंर्गत आरोप सिद्ध होऊ शकले नाहीत. त्यामुळे त्यांच्यावरील मोक्का हटवण्यात आला.  ८ मे २००६ रोजी महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने टाटा सुमो आणि इंडिका कारचा पाठलाग करुन चांदवड-मनमाड महामार्गावर दोन गाडया पकडल्या होत्या.
यावेळी तीन संशयितांना अटक करुन तीस किलो आरडीक्स, दहा एके-४७ आणि ३२०० बुलेट जप्त केल्या होत्या. त्यावेळी इंडिका गाडी जुंदाल चालवत होता. पोलिसांना चकवून तिथून निसटण्यात तो यशस्वी ठरला. अबु जुंदाल मराठवाडयातील बीड जिल्हयातील असून तो आधी मालेगावला गेला. काही दिवसांनी तो बांगलादेशला पळून गेला तिथून तो पाकिस्तानात गेला. मुंबईवरील २६/११ दहशतवादी हल्ल्यात त्याची महत्वाची भूमिका होती. २०१२ मध्ये सौदी अरेबियावरुन त्याला भारतात आणण्यात आले.

Web Title: Aurangabad arms case: Abu Jundal, seven others guilty of life imprisonment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.