औरंगाबादमध्ये अडत, किरकोळ विक्रीत तफावत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2018 11:51 AM2018-10-15T11:51:09+5:302018-10-15T11:52:36+5:30
फळे,भाजीपाला : मागील आठवड्यात औरंगाबादेत फळभाज्या व पालेभाज्यांची आवक घटली. मात्र, किरकोळमध्ये भाज्यांचे भाव कडाडले.
मागील आठवड्यात औरंगाबादेत फळभाज्या व पालेभाज्यांची आवक घटली. मात्र, किरकोळमध्ये भाज्यांचे भाव कडाडले. अडतमध्ये शेतकऱ्यांना क्ंिवटलमागे २०० ते ३०० रुपये वाढून मिळाले, पण किरकोळ विक्रीत व्यापाऱ्यांनी किलोमागे दुप्पट ते चौपट भाव कमविणे सुरू केले.
जाधववाडी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रोज २०० ते ३०० क्ंिवटल टोमॅटोची आवक होत आहे. अडतमध्ये २०० ते ४०० रुपये प्रतिक्ंिवटलने टोमॅटो विक्री झाला. मात्र, भाजीमंडईत किरकोळ विक्रीत २० ते २५ रुपये किलोपर्यंत टोमॅटो विकल्या जात आहे. गुरुवारी १० क्विंटल लिंबाची आवक झाली. अडतमध्ये ३००० ते ३५०० रुपये क्ंिवटल भाव शेतकऱ्यांना मिळाला. तोच लिंबू विक्रेते भाजीमंडईत ८० ते १०० रुपये किलोने विकत आहेत. गवार ६० ते ८० रुपये, शेवगाच्या शेंगा ८० ते १०० रुपये, बिन्स ८० ते १०० रुपये विकल्या जात आहेत.