औरंगाबाद जिल्ह्यालाही कुपोषणाचा विळखा!

By Admin | Published: January 16, 2015 05:52 AM2015-01-16T05:52:16+5:302015-01-16T05:52:16+5:30

औरंगाबाद जिल्ह्याच्या ग्रामीण भागात ४ हजार १७७ बालके कुपोषित असल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे.

Aurangabad district also got malnutrition! | औरंगाबाद जिल्ह्यालाही कुपोषणाचा विळखा!

औरंगाबाद जिल्ह्यालाही कुपोषणाचा विळखा!

googlenewsNext

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्याच्या ग्रामीण भागात ४ हजार १७७ बालके कुपोषित असल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे औरंगाबाद महापालिकेसह तालुका ठिकाणच्या नागरी वसाहतींमध्ये कुपोषित बालकांची संख्या मोठी असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
एकात्मिक बालविकास सेवा योजनेंतर्गत ग्रामीण भागातील कुपोषण निर्मूलनासाठी विशेष कार्य केले जाते. कुपोषित बालकांचे वय, उंची आणि वजन याआधारे त्यांची वर्गवारी काढण्यात येते. त्यासाठी अंगणवाडीमध्ये नियमित कुपोषित बालकांचे वजन घेण्यात येते. सर्वात कमी वजनाच्या बालकांना तीव्र कुपोषित समजले जाते. त्यानुसार जिल्ह्यात ४ हजार १७७ बालके तीव्र कुपोषित असल्याची आकडेवारी प्राप्त झाली आहे.
ही आकडेवारी ३० नोव्हेंबर २०१४ रोजीची आहे. प्रशासनाच्या मते जिल्ह्यातील केवळ १.५६ टक्के बालके तीव्र कुपोषित आहेत. जी बालके तीव्र कुपोषित नाहीत आणि साधारणही नाहीत, अशा प्रकारातील बालकांना मध्यम कुपोषित समजले जाते.
या प्रकारांतर्गत जिल्ह्यातील १७ हजार ५७ बालकांचा समावेश आहे. जिल्ह्यात सर्वसाधारण श्रेणीची २ लाख ४६ हजार ८१८ बालके आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Aurangabad district also got malnutrition!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.