औरंगाबादचे विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांची बदली कृषी विभागात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2018 05:34 AM2018-02-04T05:34:31+5:302018-02-04T05:34:43+5:30
काही आरोपांमुळे वादग्रस्त ठरलेले औरंगाबादचे विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांची शनिवारी मंत्रालयात कृषी विभागाचे सचिव म्हणून बदली केली. १२ आयएएस अधिका-यांची बदली केली आहे.
मुंबई : काही आरोपांमुळे वादग्रस्त ठरलेले औरंगाबादचे विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांची शनिवारी मंत्रालयात कृषी विभागाचे सचिव म्हणून बदली केली. १२ आयएएस अधिका-यांची बदली केली आहे.
सुनील केंद्रेकर हे औरंगाबादचे विभागीय आयुक्त असतील. विजयकुमार गौतम यांची बदली पर्यटन व सांस्कृतिक कार्य प्रधान सचिवपदी झाली आहे. अमरावती जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी के. एच. कुलकर्णी आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे आयुक्त असतील. शुल्क नियंत्रण प्राधिकरण सचिव म्हणून एम. जी. गुरसाल यांची नियुक्ती केली आहे. एमआयडीसीतील मुंबईचे सहमुख्य कार्यकारी अधिकारी ए. ए. गुल्हाने वर्धा जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी असतील. के. मंजुलक्ष्मी या सिंधुदुर्ग जि.प., निमा अरोरा या जालना जि.प. तर पृथ्वीराज बी. पी. हे परभणी जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी असतील. मनीषा खत्री या अमरावती जिल्हा परिषदेच्या नव्या मुख्य कार्यकारी अधिकारी असतील.
- नाशिक येथे सहायक जिल्हाधिकारी असलेले अमोल येडगे हे बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी असतील. गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी येथे सहायक जिल्हाधिकारी असलेले सचिन ओंबासे यांची त्याच पदावर गडचिरोली येथे बदली केली आहे.