पोलिसांच्या रडारवर औरंगाबादचे हॉस्पिटल!

By Admin | Published: December 5, 2015 09:08 AM2015-12-05T09:08:20+5:302015-12-05T09:08:20+5:30

किडनी तस्करी प्रकरण: पोलिसांचे पथक नागपूर, औरंगाबाद, सांगलीमध्ये.

Aurangabad hospital on the radar of police! | पोलिसांच्या रडारवर औरंगाबादचे हॉस्पिटल!

पोलिसांच्या रडारवर औरंगाबादचे हॉस्पिटल!

googlenewsNext

अकोला: किडनी तस्करी प्रकरणाचे धागेदोरे शुक्रवारी औरंगाबाद येथील एका हॉस्पिटलपर्यंत पोहोचले. याच हॉस्पिटलमध्ये पाच जणांच्या किडनी काढण्यात आल्याची बाब आरोपींच्या चौकशीतून उजेडात आली. त्यामुळे पोलिसांनी आपला मोर्चा या हॉस्पिटलकडे वळविला आहे. दरम्यान, या प्रकरणी आणखी तपासासाठी दोन पथके नागपूर व सांगली येथेसुद्धा गेली आहेत. जुने शहरातील शिवाजीनगरात राहणारा संतोष शंकर गवळी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आनंद भगवान जाधवकडून त्याने व्याजाने पैसे घेतले होते. व्याजाचे ही रक्कम वाढत गेली. पैसे देणे शक्य होत नसल्याने जाधवने त्यांना किडनी देण्यास प्रवृत्त केले. त्याला गवळी यांनी नकार दिल्याने त्यांना पैशासाठी धमकी देण्यात आली. अखेर हतबल होऊन त्यांनी किडनी देण्याची तयारी दर्शविली. त्यानंतर गवळींची किडनी काढण्यासाठी जाधवने त्याची भेट हरिहरपेठ येथील रहिवासी देवेंद्र श्रीधर सिरसाटशी घालून दिली. सिरसाटने गवळींना नागपूर येथील एका रुग्णालयात नेले. या ठिकाणी सर्व तपासण्या करून नागपुरातील एका मध्यस्थामार्फत किडनीच्या खरेदीदाराशी संपर्क केला आणि श्रीलंकेत कोलंबो येथील नवलोक रुग्णालयात ३ ऑक्टोबर २0१५ रोजी गवळींवर शस्त्रक्रिया करून त्यांची किडनी काढण्यात आली. परंतु, गवळी यांना चार लाख रुपयांऐवजी तीनच लाख रुपये देऊन त्यांची फसवणूक करण्यात आली. त्यानंतर गवळींनी किडनी तस्करीचा भंडाफोड केल्यावर स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी आनंद भगवान जाधव (३0) आणि देवेंद्र श्रीधर सिरसाट (४0) यांना अटक केली. हे दोघेही आरोपी सध्या पोलीस कोठडीत आहेत. आरोपींच्या चौकशीतून औरंगाबाद येथील एका हॉस्पिटलचे नाव समोर आले आणि या हॉस्पिटलमध्ये पाच जणांच्या किडनी काढण्यात आल्याची माहिती आरोपींनी पोलिसांना दिली.

*संशयित शिवाजी कोळी पसार!

          स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांची दोन पथके नागपूर आणि सांगली जिल्हय़ातील इस्लामपूरकडे गेले आहेत. इस्लामपूर येथील शिक्षक शिवाजी कोळी याचे नाव समोर आल्याने, पोलीस त्याला ताब्यात घेण्यासाठी इस्लामपूरला गेले आहेत. परंतु, त्यापूर्वी कोळी तेथून पसार झाला. यावेळी कोळी कुटुंबीयांनी पोलिसांसोबत वाद घालण्याचा प्रयत्न केला. डॉक्टर दाम्पत्याचा नागपूरमध्ये शोध किडनी तस्करी प्रकरणामध्ये यवतमाळ येथील डॉक्टर श्रोत्री दाम्पत्याचे नाव समोर आले. परंतु हे डॉक्टर दाम्पत्य आणि त्यांचे जावई नागपुरात असल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या एका पथकाने नागपूरकडे मोर्चा वळविला असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

*औरंगाबादला काढल्या किडनी

याप्रकरणी अटकेत असलेल्या दोन आरोपींची पोलिसांनी कसून चौकशी केली. शांताबाई रामदास खरात, देवानंद कोमलकर, अमर सिरसाट, संतोष कोल्हटकर यासह आणखी एकाची किडनी औरंगाबाद येथील एका हॉस्पिटलमध्ये काढण्यात आल्याची माहिती या चौकशीतून समोर आली.

Web Title: Aurangabad hospital on the radar of police!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.