औरंगाबाद: राष्ट्रवादीच्या नेत्याच्या मुलाच्या लग्नात अनेक पाहुण्यांना विषबाधा, अनेक हॉस्पिटलमध्ये दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2023 10:33 AM2023-01-05T10:33:22+5:302023-01-05T10:36:13+5:30

खाजगी रुग्णालयात अधिक रुग्ण भरती झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Aurangabad: Hundreds of guests poisoned at NCP leader's Abdul Qadeer Moulana's sons sayyad juber wedding, many admitted to hospital | औरंगाबाद: राष्ट्रवादीच्या नेत्याच्या मुलाच्या लग्नात अनेक पाहुण्यांना विषबाधा, अनेक हॉस्पिटलमध्ये दाखल

औरंगाबाद: राष्ट्रवादीच्या नेत्याच्या मुलाच्या लग्नात अनेक पाहुण्यांना विषबाधा, अनेक हॉस्पिटलमध्ये दाखल

googlenewsNext

औरंगाबादमध्ये रात्रीच्या वेळी खळबळजनक घटना घडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस नेत्याच्या मुलाच्या लग्नात जेवणातून शेकडो लोकांना विषबाधा झाल्याचे सांगण्यात येत आहे. एकाच वेळी एवढ्या मोठ्या प्रमाणावर वऱ्हाडींची प्रकृती बिघडल्याने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याची धावपळ उडाली होती. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अब्दुल कदिर मौलाना यांच्या मुलाचे बुधवारी लग्न होते. या लग्नसोहळ्यामध्ये जेवल्याने अनेक पाहुण्यांना विषबाधा झाल्याचे सांगितले जात आहे. लग्न समारंभाच्या जेवणातून विषबाधा झाल्याने  प्रकृती बिघडल्याने अनेकांना घाटी रुग्णालयासह  औरंगाबादच्या वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. 

घाटी रुग्णालयात २२ रुग्ण दाखल झाले. यातील एक जण सध्या भरती असून उर्वरित लोकांना घरी पाठविण्यात आले आहे. खाजगी रुग्णालयात यापेक्षा अधिक रुग्ण भरती झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Web Title: Aurangabad: Hundreds of guests poisoned at NCP leader's Abdul Qadeer Moulana's sons sayyad juber wedding, many admitted to hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.