औरंगाबाद-जालना ‘टिष्ट्वन सिटी’ करणार

By Admin | Published: June 13, 2015 02:02 AM2015-06-13T02:02:10+5:302015-06-13T02:02:10+5:30

आगामी १० वर्षांत औरंगाबाद-जालना या दोन्ही शहरांना एकत्रित आणून भाजपा सरकार ‘टिष्ट्वन सिटी’ करणार असून त्याचे नियोजन करण्यात येत

Aurangabad-Jalna will be 'Tastevon City' | औरंगाबाद-जालना ‘टिष्ट्वन सिटी’ करणार

औरंगाबाद-जालना ‘टिष्ट्वन सिटी’ करणार

googlenewsNext

जालना : आगामी १० वर्षांत औरंगाबाद-जालना या दोन्ही शहरांना एकत्रित आणून भाजपा सरकार ‘टिष्ट्वन सिटी’ करणार असून त्याचे नियोजन करण्यात येत असल्याची माहिती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांनी दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकारला केंद्रात एक वर्ष पूर्ण झाल्याबद्दल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात आयोजित जनसंवाद कार्यक्रमात ते बोलत होते.
दानवे म्हणाले की, भाजपा सरकारच्या एक वर्षाच्या कार्यकाळात केंद्रात आणि सात महिन्यांच्या कार्यकाळात राज्यात अनेक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. या निर्णयांची माहिती कार्यकर्त्यांनी तळागाळापर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे.
जालन्याजवळील दरेगाव येथील प्रस्तावित ड्रायपोर्ट प्रकल्पासाठी जमीन ताब्यात घेण्यासाठी जेएनपीटीने (जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट) राज्य सरकारकडे ९४ कोटी रुपयांची मागणी केली आहे. आठवडाभरात ही रक्कम प्राप्त होईल, अशी माहिती त्यांनी दिली.
पालकमंत्री बबनराव लोणीकर म्हणाले की, केंद्र व राज्य सरकारने घेतलेल्या चांगल्या निर्णयांचा अपप्रचार विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून केला जात आहे. यामध्ये प्रामुख्याने भूसंपादन कायद्याविषयक मुद्याचे उदाहरण दानवे यांनी यावेळी दिले. (प्रतिनिधी)

Web Title: Aurangabad-Jalna will be 'Tastevon City'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.