कंगनाविरोधात आंदोलन, शिवसेनेच्याच राज्यात शिवसेनेच्या आमदारावर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2020 02:04 PM2020-09-06T14:04:31+5:302020-09-06T14:07:21+5:30

राज्यात शिवसेनेची सत्ता असतानाही, शिवसेनेच्याच बाजूनेच आंदोलन करणाऱ्या शिवसैनिक आमदारावर आणि कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झाल्याने, कंगना शिवसेनेला भारी पडू लागली की काय, अशी चर्चा सर्वत्र सुरू आहे.

Aurangabad kranti chowk police booked complained against mla ambadas danve for agitation against kangana ranaut | कंगनाविरोधात आंदोलन, शिवसेनेच्याच राज्यात शिवसेनेच्या आमदारावर गुन्हा दाखल

कंगनाविरोधात आंदोलन, शिवसेनेच्याच राज्यात शिवसेनेच्या आमदारावर गुन्हा दाखल

googlenewsNext
ठळक मुद्देराज्यात शिवसेनेची सत्ता असतानाही, शिवसेनेच्याच बाजूनेच आंदोलन करणाऱ्या शिवसैनिक आमदारावर आणि कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखलकंगना रणौतने मुंबई आणि महाराष्ट्रासंदर्भात केलेल्या एका वक्तव्यामुळे शिवसेना आणि कंगना आमने सामने आले आहेत.औरंगाबादमधील शिवसैनिकांनी कंगनाचा निषेध नोंदवत आंदोलन केले.

औरंगाबाद - अभिनेत्री कंगना रणौतने मुंबई आणि महाराष्ट्रासंदर्भात केलेल्या एका वक्तव्यामुळे शिवसेना आणि कंगना आमने सामने आले आहेत. याच मुद्द्यावर औरंगाबादमधील शिवसैनिकांनी कंगनाचा निषेध नोंदवत आंदोलन केले. यामुळे या शिवसैनिकांवर क्रांती चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महत्वाचे म्हणजे आमदार अंबादास दानवे यांच्यासह माजी महापौर नंदकुमार घोडेले यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

राज्यात शिवसेनेची सत्ता असतानाही, शिवसेनेच्याच बाजूनेच आंदोलन करणाऱ्या शिवसैनिक आमदारावर आणि कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झाल्याने, आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

औरंगाबादमधील क्रांतीचौकात 4 सप्टेंबरला (शुक्रवार) दुपारच्या वेळी आमदार अंबादास दानवे, माजी महापौर नंदकुमार घोडेले यांच्यासह काही आजी माजी पदाधिकाऱ्यांनी अभिनेत्री कंगना रणौतविरोधात घोषणा बाजी करत आंदोलन केले आणि कंगनाच्या मुंबई आणि महाराष्ट्रासंदर्भातील वक्तव्याचा निषेध केला होता. 

याप्रकरणी शहर पोलीस आयुक्तांच्या जमाव बंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी आणि परवानगी न घेता निर्दशने केल्याप्रकरणी सहायक फौजदार कचरू रामराव निकम यांच्या फिर्यादीवरून आमदार अंबादास दानवे, बाळासाहेब थोरात, माजी महापौर नंदकुमार घोडेले, गिरजाराम हळनोर, विजय वाघचौरे, विश्वनाथ स्वामी,  मकरंद कुलकर्णी आणि सचिन खैरे आदींसह काही महिला कार्यकर्तांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्त्वाच्या बातम्या -

राऊतांनी लिहिलं, "मेरी हिम्मत को परखने की गुस्ताखी न करना", भाजपाच्या 'या' नेत्यानं साधला जोरदार निशाणा

मोदी सरकार आणतंय नवी पॉलिसी, भंगारमध्ये जाणार तुमची जुनी गाडी

मुंबई काय शिवसेनेच्या बापाची आहे का? कंगनाच्या पाठीशी उभे राहत भाजपा नेत्याचा शिवसेनेवर हल्लाबोल

ताफा थांबवून बच्चू कडू धावले अपघातग्रस्तांच्या मदतीला, स्वत:च्या गाडीतून जखमींना पोहोचवलं रुग्णालयात

Web Title: Aurangabad kranti chowk police booked complained against mla ambadas danve for agitation against kangana ranaut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.