औरंगाबादच्या पोलिस कॉन्स्टेबलने सर केले ' एव्हरेस्ट शिखर'

By Admin | Published: May 19, 2016 01:52 PM2016-05-19T13:52:25+5:302016-05-20T00:50:26+5:30

रफिक शेख या पोलिस कॉन्स्टेबलने अथक प्रयत्नांनंतर एव्हरेस्ट शिखर सर केले असून अशी कामगिरी करणारा तो मराठवाड्यातले पहिला एव्हरेस्टवीर ठरले.

Aurangabad police constable chanted 'Everest Peak' | औरंगाबादच्या पोलिस कॉन्स्टेबलने सर केले ' एव्हरेस्ट शिखर'

औरंगाबादच्या पोलिस कॉन्स्टेबलने सर केले ' एव्हरेस्ट शिखर'

googlenewsNext
ऑनलाइन लोकमत
औरंगाबाद, दि. १८ - माणसाच्या मनात जिद्द असेल तर कितीही अडचणी आल्या तरी त्या पार करून तो आपलं ध्येय गाठतोच, असं म्हणतात. औरंगाबादमधील पोलिस कॉन्स्टेबल रफिक शेखने हे म्हणणे खरे करून दाखवले आहे. जिद्दीच्या जोरावर त्याने जगातील सर्वात उंच असलेले 'एव्हरेस्ट शिखर' सर करून दाखवले आहे. अशी कामगिरी करणारा तो पहिलाच पोलिस कॉन्स्टेबल आहे. 
 
औरंगाबादचा रहिवासी असलेल्या रफिकने लहानपणापासूनच जगातील सर्वात उंच शिखर असलेल्या एव्हरेस्टवर चढाई करायची, असे स्वप्न उराशी बाळगले होते. त्यादृष्टीने प्रयत्नही सुरू केले होते. औरंगाबाद जिल्ह्यातील नायगाव या खेड्यातील शेतकरी कुटूंबात जन्मलेला शेख रफिक हा ग्रामीण पोलिस मुख्यालयात हवालदार म्हणून कार्यरत आहे़. लहानपणापासमन जगातील उंच शिखर माउंट एव्हरेस्ट चढण्याचे स्वप्न त्याने पाहिले होते़ घरची परिस्थिती तशी बेताचीच, एव्हरेस्टचा खर्च पेलणार की नाही हे अस्पष्ट असतानाही त्याने जाण्याचा निर्णय घेतला़. मागील दोन वेळा दानशूर व्यक्तींनी मदत केल्यामुळे रफिक या दिशेने झेपावला़ परंतु, दोन्ही वेळेस निसर्गाची अपकृपा झाल्याने त्याला माघारी यावे लागले़. २०१४ व २०१५ साली सर्व क्षमतेने सज्ज असूनही भीषण नैसर्गिक आपत्तीमुळे रफीकला माघारी फिरावे लागले होते. पहिल्या वर्षी हिमस्खलन, दुसऱ्या वर्षी विनाशकारी भूकंप, यामुळे एव्हरेस्टच्या दिशेने कूच केलेली असतानाही रफिकला मोहिमेत अपयश आले, मात्र तरीही त्याने जिद्द न सोडता यावर्षी पुन्हा स्वप्नाच्या दिशेने झेप घेतली. आपले गावातील घर विकून एव्हरेस्ट सर करण्याचा निर्णय त्याने घेतला होता. ४ एप्रिल रोजी एव्हरेस्ट मोहिमेवर निघालेल्या रफिकने आज, १९ मे रोजी हे शिखर सर करून आपले स्वप्न पूर्ण केलेच. तीन वर्षांच्या अथक प्रयत्नांनंतर रफिकने आज सकाळी एव्हरेस्टला गवसणी घातली. तीन वर्षांच्या अथक प्रयत्नांनंतर रफिकने आज सकाळी एव्हरेस्टला गवसणी घातली. एव्हरेस्ट सर करणारा तो महाराष्ट्र पोलिस दलातला पहिलाच जवान ठरला आहे.  
 

दोन वेळेस हुलकावणी

दोन वर्षांपूर्वी बेस कॅम्पपर्यंत पोहोचलेल्या रफिकच्या चढाईला सुरूवात होते न होते तोच हिमस्खलन झाले त्यात १६ शेरपा मृत्युमुखी पडले. एव्हरेस्ट मोहिमेच्या इतिहासातील ती पहिलीच सर्वात मोठी मनुष्यहानी होती. त्यामुळे नेपाळ सरकारने वर्षभरातील सर्व मोहिमा रद्द केल्या. तेव्हा रफिकलाही माघारी फिरावे लागले. पुढच्या वर्षी पुन्हा जय्यत तयारीनिशी रफिक या मोहिमेवर गेला. मात्र २४ एप्रिल २०१५ ला काठमांडू येथे झालेल्या भूकंपामुळे सागरमाथा हादरला व बेस कँपवर हिमकडा (आईस वॉल) कोसळून झालेल्या अपघातामुळे त्याला पुन्हा परतावे लागले. पहिल्या दोन्ही वेळी कर्ज काढून, वेगवेगळ्या लोकांची मदत घेऊन त्याने मोहीम आखली. पण दोन्ही वेळा प्रत्येकी १५ लाख रुपयांचे नुकसान सोसावे लागले

 

घर काढले होते विक्रीला

नैसर्गिक आपत्तींमुळे सलग दोन वर्षे मोहिमेवरून परत यावे लागलेल्या रफिकला जिद्द पूर्ण करण्यासाठी यापूर्वी ३० लाखांची झळ सोसावी लागली होती़. तिस-या वर्षीही एव्हरेस्ट सर करण्याचे ध्येय कायम होतं. मोहिमेसाठी निधी उभा कसा करायचा म्हणून त्याने नायगाव (ता़ औरंगाबाद) येथील त्याचे घर विकण्याची तयारी केली होती़. दानशूर मंडळींनी तसेच पोलीस प्रशासनाने केलेल्या मदतीमुळे त्याने जिद्द सोडली नव्हती़. अखेर आज त्याच्या प्रयत्नांना यश मिळाले. 

Web Title: Aurangabad police constable chanted 'Everest Peak'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.