औरंगाबादमध्ये दरोडेखोरांचा धुमाकूळ, ६७ हजार रुपये पळवले

By Admin | Published: March 13, 2016 10:37 PM2016-03-13T22:37:33+5:302016-03-13T22:37:33+5:30

कुटुंबीय गाढ झोपेत असताना दरोडेखोरांनी दोन घरांवर हल्ला चढवला. कुलूप तोडून घरात घुसलेल्या दरोडेखोरांनी झाल्टा येथे रविवारी पहाटे २ ते ३ वाजेच्या सुमारास धुमाकूळ घातला.

In Aurangabad, the racket was found to be worth Rs 67,000 | औरंगाबादमध्ये दरोडेखोरांचा धुमाकूळ, ६७ हजार रुपये पळवले

औरंगाबादमध्ये दरोडेखोरांचा धुमाकूळ, ६७ हजार रुपये पळवले

googlenewsNext

औरंगाबाद : कुटुंबीय गाढ झोपेत असताना दरोडेखोरांनी दोन घरांवर हल्ला चढवला. कुलूप तोडून घरात घुसलेल्या दरोडेखोरांनी लोखंडी रॉड, लाठ्या-काठ्यांनी मारहाण करीत झाल्टा येथे रविवारी पहाटे २ ते ३ वाजेच्या सुमारास धुमाकूळ घातला. यात चौघे जखमी असून दोन जण गंभीर आहेत. त्यांच्यावर खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरूआहेत. रेखा दीपक शिंदे, वाळोबा गवळी अशी गंभीर जखमींची नावे आहेत. या प्रकरणी चिकलठाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी सांगितले की, दीपक शेषराव शिंदे (रा. झाल्टा) यांच्या बंगल्यात तीन दरोडेखोरांनी पहाटे ३ च्या सुमारास दरोडा घातला. शिंदे कुटुंबीय झोपेत असतानाच घराचा कडीकोंडा तोडून ते बंगल्यात घुसले. दीपक यांच्या पत्नी रेखा यांच्या खोलीत शिरून त्यांच्यावर चाकूने वार केले. त्यांचे वडील व अन्य नातेवाईकांना धमकावून दरोडेखोरांनी कपाटे उचकटली. आतून सोन्याची एकदाणी, अंगठ्या पोत, मोबाईल, अशा वस्तू लंपास केल्या.
शिंदे यांच्या घरी धुमाकूळ घातल्यानंतर दरोडेखोरांनी आपला मोर्चा गजानन नंदू सुरासे यांच्या घराकडे वळवला. त्यांच्या घरावर चालून गेलेल्या दरोडेखोरांनी कुलूप तोडून आत प्रवेश केला. येथेही दरोडेखोरांनी कुटुंबियांना लाठ्या-काठ्यांनी मारहाण केली. घरातून रोकड आणि सोन्याचे दागिने मिळून ६७ हजार रुपयांचा ऐवज लुटला. चोरीचा प्रकार सुरू असतानाच सागर सुरासे यांना जाग आली. त्यांची दरोडेखोरांसोबत झटापट झाली. दरोडेखोरांनी त्यांच्यावर चाकूने वार केले. दरोड्याचा हा प्रकार लक्षात येताच शेजाऱ्यांनी एकाला पकडण्याचा प्रयत्न केला; परंतु दरोडेखोरांनी बाळू सुरासेंच्या डोक्यात वार केला. यात ते जखमी झाले. त्यानंतर दरोडेखोरांनी घटनास्थळावरून काढता पाय घेतला.

Web Title: In Aurangabad, the racket was found to be worth Rs 67,000

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.