औरंगाबादमध्ये विदेशी मद्यासह 9 लाखाचा ऐवज जप्त
By Admin | Published: April 8, 2017 06:11 PM2017-04-08T18:11:37+5:302017-04-08T18:11:37+5:30
महामार्गावरील दारूची दुकाने, बिअर बार बंद झाल्यापासून अवैध दारू विक्रीला जोम आला आहे. यापार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने चोरट्या मार्गाने नेण्यात येणा-या दारूसाठ्यासह
>ऑनलाइन लोकमत
औरंगाबाद, दि. 8 - महामार्गावरील दारूची दुकाने, बिअर बार बंद झाल्यापासून अवैध दारू विक्रीला जोम आला आहे. यापार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने चोरट्या मार्गाने नेण्यात येणा-या दारूसाठ्यासह 9 लाखाचा मुद्देमाल जप्त केला. यावेळी एका जणाला अटक करण्यात आली.ही कारवाई जालना रोडवरील शेकटा येथे करण्यात आली.
सतीश अशोक मोरे असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. याविषयी अधिक माहिती देताना राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक सी.बी.राजपूत यांनी सांगितले की, महामार्गावरील मद्यालये १ एप्रिलपासून सर्र्वाेच्च न्यायलायाच्या आदेशाने बंद करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर निरीक्षक शिवाजी वानखेडे आणि कर्मचारी हे औरंगाबाद-जालना रोडवर गस्तीवर असताना एका पिकप जीपमधून अवैध दारूसाठा नेण्यात येत असल्याची माहिती खबºयाकडून त्यांना मिळाली. यानंतर पहाटे ४ वाजेच्या सुमारास शेकटा येथील हॉटेल अमृतसर पंजाबीसमोर उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाºयांनी जीप (क्रमांक एमएच-२२एए २७५०)संशयितरित्या जात असल्याचे त्यांंना दिसले. यावेळी अधिकाºयांनी त्या जीपला हात दाखवून चालकास थांबण्याचा इशारा केला. मात्र जीपचालक न थांबता पुढे सुसाट निघाला. यानंतर अधिकारी कर्मचाºयांनी सरकारी वाहनातून पाठलाग करुन जीप पकडली.या जीपची झडती घेतली असता त्यात अरुणाचल प्रदेशात विक्रीसाठी असलेल्या विदेशी दारूच्या बाटल्यांचे ५० बॉक्स आढळले. ७५० मिलि च्या यात ६०० बाटल्या होत्या. या जीपसह मद्यसाठ्याची किंमत ८लाख ९१ हजार ४००रुपये असल्याचे अधिकाºयांनी सांगितले. ही कारवाई निरीक्षक वानखेडे, उपनिरीक्षक जी.एल.पुसे, ए.जी. शिंदे, जवान ए.के. जायभाये, ए.पी.नवगिरे,एम.एम.पठाण, संजय बागुल यांनी केली.