औरंगाबाद पर्यटनसमृद्ध!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2016 01:19 AM2016-07-09T01:19:28+5:302016-07-09T01:19:28+5:30
पर्यटनाला अधिकाधिक चालना मिळण्यासाठी नवनवीन संधी शोधण्याच्या उद्देशाने परराष्ट्र मंत्रालयाने, आॅक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात देशातली पहिली
मुंबई : पर्यटनाला अधिकाधिक चालना मिळण्यासाठी नवनवीन संधी शोधण्याच्या उद्देशाने परराष्ट्र मंत्रालयाने, आॅक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात देशातली पहिली
पर्यटन परिषद राज्याची पर्यटन राजधानी असणाऱ्या औरंगाबादमध्ये
आयोजित करण्याचा निर्णय
घेतला आहे.
याविषयी पर्यटन आणि सांस्कृतिक विभागाच्या प्रधान
सचिव वल्सा नायर सिंग म्हणाल्या, ‘अजिंठा-वेरूळ’च्या लेण्यांकडे पर्यटकांचा नेहमीच मोठा ओघ राहिला आहे. राज्यात येणाऱ्या देशी, तसेच परदेशी पर्यटकांना या स्थळांनी नेहमीच आकर्षित केले आहे.
ऐतिहासिक रेशीम मार्ग आणि
चीनसह जगभरातल्या बुद्धिस्ट वर्तुळाशी असलेला संबंध अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. पद्मपाणिची (बुद्ध) भलीमोठी शिल्पे असल्याने
अजिंठाचा समावेश नेहमीच जगातल्या
अप्रतिम पर्यटन स्थळांमध्ये होतो. त्यामुळे या परिषदेसाठी औरंगाबादची निवड करण्यासाठी ही कारणे
पुरेशी आहेत. या परिषदेच्या
निमित्ताने औरंगाबाद आणि
राज्यातील इतर पर्यटनस्थळांचा पुरस्कार होईल.
या परिषदेच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेत, यासाठी पर्यटनखाते प्रयत्नात आहे. पहिल्या दिवशी अफगाणिस्तान, बांगलादेश, भूतान, भारत, मालदीव, नेपाळ, पाकिस्तान आणि श्रीलंका या सार्क देशांचे अधिकारी (साउथ एशियन असोसिएशन फॉर रिजनल कोआॅपरेशन) या परिषदेला हजेरी लावणार आहेत. दुसऱ्या दिवशी या देशांचे पर्यटनमंत्री, तसेच भारतीय राज्यातले मंत्री सहभागी होतील.
अजिंठा आणि शहरातल्या इतर पर्यटनस्थळांकडे परदेशी, तसेच देशी पर्यटकांचा ओघ वाढावा, यासाठी २०१८ मध्ये अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. गोल्फ टुरिझमबरोबरच शहरात फूड फेस्टिवल आणि हँडीक्राफ्ट फेस्टिव्हल भरवण्यासही मोठा वाव आहे. वेरूळ इथे एमटीडीसीच्या ९०० एकर जागेवर बुद्धिस्ट सेंटर बांधण्यावर विचार चालू आहे. (प्रतिनिधी)
२०१७ हे ‘व्हिजिट महाराष्ट्र वर्ष’
पर्यटन क्षेत्राच्या वाढ आणि विकासासाठी पुढील दोन वर्षे अत्यंत महत्त्वाची आहेत. २०१७ हे वर्ष ‘व्हिजिट महाराष्ट्र वर्ष’ म्हणून साजरे केले जाईल आणि २०१८ हे वर्ष जॉन स्मिथ या ब्रिटिश अधिकाऱ्याने अजिंठा लेणी शोधल्याला २०० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने साजरे केले जाईल. महाराष्ट्रातल्या पर्यटनस्थळांची महती जगभरात पसरावी, यासाठी एक कॅम्पेन सुरू करण्यात येईल. ‘व्हिजिट महाराष्ट्र २०१७’अंतर्गत या कॅम्पेनचे प्रमोशन केले जाईल.
टुरिझम स्टार्टअपसाठी आर्थिक सहाय्य
स्टार्ट-अप योजनेंतर्गत पर्यटन व्यवसायामध्ये नवा सेटअप उभारू इच्छिणाऱ्यांना ५० लाखांपर्यंत आर्थिक सहाय्य देण्याची घोषणाही करण्यात आली आहे.
आॅक्टोबरमध्ये ‘अजिंठा-वेरूळ महोत्सव’
- १४ ते १६ आॅक्टोबरदरम्यान एमटीडीसीच्या सहकार्याने तीन दिवसांचा अजिंठा-वेरूळ महोत्सव भरवला जाणार आहे. औरंगाबाद महानगरपालिकेला शहरातल्या सर्व पर्यटनस्थळांना भेट देणाऱ्या सिटी टूर बसची योजना करण्याची सूचना केली आहे. मुंबई, दिल्ली आणि हैद्राबादबरोबरच औरंगाबादची जयपूर, उदयपूर, नागपूर आणि पुणे या शहरांशी असलेली एअर कनेक्टिव्हिटी वाढवण्याची गरजही त्यांनी अधोरेखित केली.