काजव्यांचा विलोभनीय प्रकाशोत्सव

By admin | Published: May 28, 2017 01:02 AM2017-05-28T01:02:29+5:302017-05-28T01:02:29+5:30

राधानगरीत पर्यटकांची गर्दी : पावसाळ्यापर्यंत चालणार रोज ‘काजवा महोत्सव’

Auspicious Festival of Cows | काजव्यांचा विलोभनीय प्रकाशोत्सव

काजव्यांचा विलोभनीय प्रकाशोत्सव

Next

संदीप आडनाईक ।  लोकमत न्यूज नेटवर्क -कोल्हापूर : राधानगरी-काळम्मावाडीच्या जंगल परिसरात शुक्रवारी (दि. २६) सायंकाळपासून रात्रीपर्यंत राज्यातून आलेल्या पर्यटकांनी विविध झाडांवर चमकणाऱ्या काजव्यांचा चांदण्याच्या साक्षीने प्रकाशोत्सव अनुभवला. चित्रपट, मालिकेत दाखविण्यात आलेले हे चमकणारे काजवे प्रत्यक्ष पाहण्यासाठी पर्यटकांची राधानगरीत तुंबळ गर्दी झाल्याने हा एक झगमगता इव्हेंटच झाला होता. पहिला पाऊस पडेपर्यंत हा ‘काजवा महोत्सव’ रोज चालणार आहे.राधानगरी येथील बायसन नेचर क्लब या संस्थेमार्फत २६ मेपासून ‘काजवा प्रकाशोत्सव’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे उद्घाटन शाहू छत्रपती यांच्या हस्ते झाले. यावेळी आमदार प्रकाश आबिटकर, अजितदादा पवार यांच्या मातोेश्री आशाताई पवार, आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन बायसन नेचर क्लबचे सम्राट केरकर यांनी केले.
सायंकाळी सात ते रात्री १० या वेळेत काजव्यांचे दर्शन घेण्यासाठी पर्यटकांची पदभ्रमंती, चांदण्या रात्री सहकुटुंब स्नेहभोजन, करमणुकीचे कार्यक्रम अशा या काजवा महोत्सवात विविध ठिकाणांहून आलेल्या पर्यटकांनी भाग घेतला आहे. पहिला पाऊस पडेपर्यंत हा महोत्सव रोज अनुभवता येणार आहे.
जैवविविधेतमध्ये महत्त्वाच्या आणि दुर्मीळ होत चाललेल्या काजव्यांचे दर्शन ही अनोखी अनुभूती शुक्रवारी रात्री पर्यटकांनी अनुभवली. मे महिन्याच्या अखेरच्या आठवड्यापासून पहिल्या पावसाचे आगमन होईपर्यंत राधानगरी, दाजीपूर, काळम्मावाडी या जंगल परिसरातील असंख्य झाडांवर हे काजवे चमकताना दिसतात. याच काळात काजवे नैसर्गिकरीत्या आपल्या प्रकाशाने जोडीदाराला आकर्षित करण्याचा प्रयत्न करीत असतात. काजव्यांचा हा तात्पुरता आशियाना अतिशय देखणा आणि विलोभनीय दिसतो आहे.



निवडक झाडांवरच आढळतो
निसर्गातील अत्यंत अद्भुत असा हा कीटक राधानगरीसारख्या जंगल परिसरात चमकताना आढळतो. दाजीपूर, राधानगरी, काळम्मावाडी जंगल परिसरातील हिरडा, बेहडा, अंजनी, जांभूळ, आंबा, उंबर, करंज या निवडक झाडांवरच हा काजव्यांचा थवा पाहण्यास आढळतो.


राधानगरीजवळील काळम्मावाडी परिसरात आयोजित करण्यात आलेल्या काजवा महोत्सवात शुक्रवारी पर्यटकांनी काजव्यांचा अनोखा प्रकाशोत्सव अनुभवला.

Web Title: Auspicious Festival of Cows

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.