ऑस्ट्रेलियन विद्यार्थीनीचा टॅक्सीत विनयभंग

By admin | Published: January 29, 2017 01:25 AM2017-01-29T01:25:16+5:302017-01-29T01:25:16+5:30

चालत्या टॅक्सीत सीट बेल्ट लावण्याच्या नावाखाली टॅक्सीचालकाने आॅस्टे्रलियन विद्यार्थीनीचा विनयभंग केल्याची घटना कुलाबा येथे घडली. याप्रकरणी विद्यार्थीनीच्या तक्रारीवरुन

Australian student's taxi misconduct | ऑस्ट्रेलियन विद्यार्थीनीचा टॅक्सीत विनयभंग

ऑस्ट्रेलियन विद्यार्थीनीचा टॅक्सीत विनयभंग

Next

मुंबई : चालत्या टॅक्सीत सीट बेल्ट लावण्याच्या नावाखाली टॅक्सीचालकाने ऑस्ट्रेलियन विद्यार्थीनीचा विनयभंग केल्याची घटना कुलाबा येथे घडली. याप्रकरणी विद्यार्थीनीच्या तक्रारीवरुन पोलिसांनी टॅक्सीचालकाला बेड्या ठोकल्या आहेत. जियाहुल अन्सारी (३०) असे टॅक्सीचालकाचे नाव असून त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे.
मुळची ऑस्ट्रेलियन असलेली २० वर्षीय विद्यार्थीनी २०१६ मध्ये एका संस्थेत शिक्षणासाठी मुंबईत आली. कुलाबा येथील हॉस्टेलमध्ये ती राहते. २० तारखेला रात्री साडेआठच्या सुमारास तिने सीएसटी येथून हॉस्टेलकडे जाण्यासाठी अन्सारीच्या टॅक्सीत बसली. मात्र मुंबईत सीट बेल्ट लावणे सक्तीचे असल्याचे सांगितले. आणि स्वत:च सीट बेल्ट लावण्याच्या नावाखाली विनयभंग केला तर पुढे चालत्या टॅक्सीतही सीट बेल्ट च्या नावाखाली त्याने पुन्हा तिच्यासोबत अश्लील चाळे केले. अखेर कुलाबा येथे सिग्नल लागताच विद्यार्थीनीने संधी साधून पळ काढला. २५ तारखेला कुलाबा येथून जात असताना अन्सारी तिला पुन्हा दिसला. तिने त्याचा पाठलाग केला आणि टॅक्सीचा क्रमांक घेतला. याबाबत तिने संस्थेतील महिलेला याबाबत सांगितले. अखेर महिलेच्या सांगण्यावरुन २६ जानेवारी रोजी तिने कुलाबा पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली या घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पोलीस उपायुक्त मनोज शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु केला. अशात परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने त्यांनी टॅक्सी चालकाची ओळख पटविली. त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली असल्याची माहिती पोलीस उपायुक्त मनोज शर्मा यांनी दिली. (प्रतिनिधी)

Web Title: Australian student's taxi misconduct

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.