लेखक दिलीप वि. चित्रे यांचं निधन
By Admin | Published: July 1, 2017 11:50 AM2017-07-01T11:50:53+5:302017-07-01T14:35:14+5:30
भारतीय वेळेनुसार शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास त्यांचं निधन झालं
>ऑनलाइन लोकमत
वॉशिंग्टन, दि. 1 - अमेरिकेत स्थित ख्यातनाम लेखक दिलीप वि. चित्रे यांचं निधन झालं आहे. भारतीय वेळेनुसार शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास त्यांचं निधन झालं. ते 75 वर्षांचे होते. आठ दिवसांपुर्वी त्यांची प्रकृती बिघडली होती. त्यांच्यावर उपचारही करण्यात आले. मात्र प्रकृती खालावल्याने त्याचं निधन झालं. त्यांच्या मागे पत्नी लेखिका शोभा चित्रे, दोन मुलं, सुना आणि नातवंडं असा परिवार आहे.
अमेरिकेतील भारतीयांच्या अनुभवावर आधारलेलं "अलिबाबाची हीच गुहा" हे त्याचं नाटक खूप गाजलं होतं. अमेरिकेसोबत भारतातही या नाटकाचे अनेक प्रयोग पार पडले. 1970 च्या दशकात इंटरनेट पुर्वकाळात जगभरातील वेगवेगळ्या देशात वास्तव्यास असलेल्या लेखकांकडून लिहून घेतलेल्या कथांचा एक महत्वपुर्ण प्रोजेक्ट त्यांनी एडिट केला होता. यावर आधारित "कुंपणाबाहेरचे शेत" नावाचा कथासंग्रही त्यांनी प्रसिद्ध केला होता.
अमेरिकेतील मराठी मंडळांच्या सांस्कृतिक कार्यात ते नेहमी पुढाकर घेत असत. तसंच महाराष्ट्र फाऊंडेशनच्या संचालक मंडळावर स्थापनेपासून ते कार्यरत होते.