'शोध' कादंबरीचे लेखक मुरलीधर खैरनार कालवश
By admin | Published: December 6, 2015 04:13 PM2015-12-06T16:13:26+5:302015-12-06T16:19:17+5:30
'शोध' या जुलै महिन्यात प्रसिद्ध झालेल्या पहिल्याच कादंबरीने अफाट वाचकप्रियता मिळवलेले लेखक मुरलीधर खैरनार यांचे प्रदीर्घ आजाराने नाशिकमध्ये निधन झाले
Next
>ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. ६ - 'शोध' या जुलै महिन्यात प्रसिद्ध झालेल्या पहिल्याच कादंबरीने अफाट वाचकप्रियता मिळवलेले लेखक मुरलीधर खैरनार यांचे प्रदीर्घ आजाराने निधन झाले. ते ५६ वर्षांचे होते. 'शोध' ही कादंबरी वाचकांच्या पसंतीस उतरल्याने अवघ्या चार महिन्यात कादंबरीची दुसरी आवृत्ती प्रकाशित करावी लागली होती.
खैरनार यांची एक उत्तम माहितीपट निर्माता, नाट्य अभिनेता, दिग्दर्शक, व्याख्याता व कलासंघटक म्हणून ओळख होती. त्यांनी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, दीपक मंडळ, शेतकरी संघटनेचा कार्यकर्ता म्हणूनही काम पाहिले होते.
कुसमाग्रज प्रतिष्ठानने कादंबरी लिखाणासाठी घोषित केलेल्या पहिल्या राज्यस्तरीय शिष्यवृत्तीने त्यांचा गौरव करण्यात आला होता. तसेच नाशिक सार्वजनिक वाचनालया कादंबरी लिखाणाच्या पुरस्कार देऊन नुकताच त्यांचा सत्कार करण्यात आला होता.