रिक्षाचालकांनो, आता २२ मेपासून ऑनलाईन अर्ज करा अन् दीड हजार अनुदान मिळवा 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2021 05:27 AM2021-05-20T05:27:20+5:302021-05-20T05:27:54+5:30

कोविड संसर्ग रोखण्यासाठी कडक निर्बंध लावल्यानंतर दुर्बल घटक व हातावर पोट असणाऱ्या श्रमिकांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत पॅकेज घोषित केले होते.

Auto Rickshaw Driver, now apply online from May 22 and get Rs 1500 grants | रिक्षाचालकांनो, आता २२ मेपासून ऑनलाईन अर्ज करा अन् दीड हजार अनुदान मिळवा 

रिक्षाचालकांनो, आता २२ मेपासून ऑनलाईन अर्ज करा अन् दीड हजार अनुदान मिळवा 

Next

मुंबई : कोरोना निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर रिक्षा चालकांसाठी राज्य सरकारने दीड हजार रुपयांच्या अनुदानाची घोषणा केली होती. अनुदान वाटपाचे काम अंतिम टप्प्यात आले असून २२ मेपासून रिक्षाचालकांना यासाठी ऑनलाइन अर्ज करता येणार आहे.

कोविड संसर्ग रोखण्यासाठी कडक निर्बंध लावल्यानंतर दुर्बल घटक व हातावर पोट असणाऱ्या श्रमिकांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत पॅकेज घोषित केले होते. त्यात परवानाधारक रिक्षाचालकांना एकवेळचे अर्थसहाय्य म्हणून १५०० रुपये देण्याचे ठरले हाेते. यासंदर्भत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली १९ एप्रिल रोजी झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला हाेता.  रिक्षाचालकांना कोणतेही कागदपत्र सादर न करता केवळ ऑनलाइन प्रणालीवर त्यांचा वाहन क्रमांक, अनुज्ञप्ती क्रमांक व आधार क्रमांक नोंद करावा लागणार आहे. ही माहिती संगणक प्रणालीवर प्रमाणित करण्यात येईल. याची कार्यप्रणाली आयसीआयसीआय बँकेमार्फत विकसित करण्यात आली असून, त्याबाबतची चाचणी अंतिम टप्प्यात आहे. २२ मे पासून रिक्षाचालकांना अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध केली जाईल, अशी माहिती परिवहन आयुक्त कार्यालयाने दिली.

निधी राज्य सरकारकडून उपलब्ध
अनुदानासाठी आवश्यक सर्व निधी राज्य सरकारकडून उपलब्ध झाला आहे. ज्या रिक्षा चालकांचे आधार क्रमांक बँक खात्याशी जुळतील, त्यांना एकवेळचे अर्थसहाय्य त्यांच्या संबंधित बँक खात्यात त्वरित जमा होणार असल्याची माहितीही परिवहन आयुक्त कार्यालयातर्फे देण्यात आली आहे.

Web Title: Auto Rickshaw Driver, now apply online from May 22 and get Rs 1500 grants

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.