म.रे.लासुद्धा स्वयंचलित दरवाजे बसवणार
By admin | Published: May 2, 2015 01:36 AM2015-05-02T01:36:59+5:302015-05-02T10:17:08+5:30
गर्दीच्या वेळेत लोकलच्या दरवाजातून पडून होणारे अपघात रोखण्यासाठी रेल्वेकडून लोकल गाड्यांना स्वयंचलित दरवाजे बसविण्यात येत आहेत.
Next
मुंबई : गर्दीच्या वेळेत लोकलच्या दरवाजातून पडून होणारे अपघात रोखण्यासाठी रेल्वेकडून लोकल गाड्यांना स्वयंचलित दरवाजे बसविण्यात येत आहेत.
ही चाचणी करण्यासाठी स्वयंचलित दरवाजा असलेली एक लोकल पश्चिम रेल्वे मार्गावर धावत असून यानंतर मध्य रेल्वे मार्गावरीलही लोकल गाड्यांना स्वयंचलित दरवाजा बसविण्यात येणार आहे. मध्य रेल्वेवरीलही एका लोकलला स्वयंचलित दरवाजा बसवून चाचणी करणा असल्याची माहिती मध्य आणि पश्चिम रेल्वे महाव्यवस्थापक सुनिल कुमार सूद यांनी दिली. एका डब्यात एकाच बाजूला स्वयंचलित दरवाजे तर अन्य दरवाजे हे खुले राहतील. प्रवाशांना कुठला दरवाजा सोयिस्कर वाटत आहे, हे दिसून येईल, असे सूद म्हणाले.