स्वयंचलित हवामान केंद्रे उभारणार

By admin | Published: April 28, 2016 05:55 AM2016-04-28T05:55:43+5:302016-04-28T05:55:43+5:30

राज्यात विविध ठिकाणी कर्नाटकच्या धर्तीवर स्वयंचलित हवामान केंद्रे उभारण्यात येतील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले.

Automatic weather stations will be set up | स्वयंचलित हवामान केंद्रे उभारणार

स्वयंचलित हवामान केंद्रे उभारणार

Next

मुंबई : राज्यात विविध ठिकाणी कर्नाटकच्या धर्तीवर स्वयंचलित हवामान केंद्रे उभारण्यात येतील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले. त्यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहावर झालेल्या बैठकीत राज्य आपत्ती व्यवस्थापन आराखड्यास मान्यता देण्यात आली.
प्रत्येक जिल्ह्यातील ५० शिक्षकांना आपत्ती व्यवस्थापनाचे मास्टर ट्रेनर्सचे प्रशिक्षण देऊन त्यांच्यामार्फत इतर शाळेतील शिक्षकांना प्रशिक्षण देणे, विभागीय आपत्ती व्यवस्थापन समन्वयक आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी या पदांची कायमस्वरूपी निर्मिती करण्याची तरतूद या आराखड्यात करण्यात आली आहे. अद्ययावत राज्य आपत्कालीन कार्य केंद्र आणि जिल्हा आपत्कालीन कार्य केंद्रांची उभारणी केली जाईल. राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणातील सल्लागारांची फेरनियुक्ती करण्यात येणार आहे. हवामानाचा अचूक अंदाज यावा, यासाठी स्वयंचलित केंद्रे उभारण्यावर भर दिला जाईल, असे फडणवीस यांनी या वेळी सांगितले.
महसूलमंत्री एकनाथ खडसे, मदत व पुनर्वसन राज्यमंत्री दिलीप कांबळे, आदर्श गाव संकल्प आणि प्रकल्प समितीचे प्रमुख पोपटराव पवार, मुख्य सचिव स्वाधिन क्षत्रिय, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे सदस्य कमल किशोर, यू.एन.डी.पी.चे संचालक जॉको सिलर्स, जागतिक बँकेचे संचालक ओनोरुई, एन. सी. आर. एम. पी. जागतिक बँकेचे सौरभ दाणी आदी मान्यवर उपस्थित होते. (विशेष प्रतिनिधी)
धोरणात्मक निर्णय घेणार
जागतिक तापमानवाढ व त्याचे कृषी क्षेत्रावर होणारे दुष्परिणाम याबाबत त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा अभ्यास गट नेमून कायमस्वरूपी उपाययोजनेबाबत धोरणात्मक निर्णय घेणे आवश्यक आहे, असे खडसे या वेळी म्हणाले. केंद्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने राबविलेला आपत्ती व्यवस्थापन कार्यक्रम राज्यात प्रभावीपणे राबविला जाईल, असे क्षत्रिय यांनी सांगितले.

Web Title: Automatic weather stations will be set up

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.