रायगडमध्ये ६० ठिकाणी स्वयंचलित हवामान केंद्रे
By admin | Published: April 7, 2017 05:15 AM2017-04-07T05:15:06+5:302017-04-07T05:15:06+5:30
राज्यभरात मंडळ अधिकारी स्तरावर स्वयंचलित हवामान केंद्रांची उभारणी करण्याचा निर्णय राज्य सरकारच्या कृषी विभागाने घेतला
Next
अलिबाग : राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत राज्यभरात मंडळ अधिकारी स्तरावर स्वयंचलित हवामान केंद्रांची उभारणी करण्याचा निर्णय राज्य सरकारच्या कृषी विभागाने घेतला आहे. त्याअंतर्गत जिल्ह्यात ६० स्वयंचलित हवामान केंद्रांची उभारणी करण्यात येईल, अशी माहिती जिल्हा कृषी अधीक्षक के. बी. तरकसे यांनी दिली.
जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समन्वय समितीची स्थापना केली आहे. राज्य सरकारने स्कायमेट संस्थेला आॅटोमॅटिक वेदर स्टेशन उभारणीचे काम सोपवले आहे. संस्थेच्या अधिकाऱ्यांनी दोन दिवसांपूर्वीच रायगड जिल्ह्याला भेट दिली व हवामान केंद्र उभारणी करण्याच्या जागांचा आढावा घेतला. (विशेष प्रतिनिधी)