मुंबई-पुणे प्रवास होणार सुखकर, ५० बसेसमध्ये वाय-फाय होणार उपलब्ध

By admin | Published: August 16, 2016 01:31 PM2016-08-16T13:31:16+5:302016-08-16T13:34:58+5:30

मुंबई-पुणे मार्गावरील प्रवाशांचा प्रवास आणखी सुखकर व्हावा यासाठी या मार्गावरील जवळपास ५० बसमध्ये वायफाय बसवण्यात येणार आहेत.

Available for Wi-Fi in Mumbai-Pune journey, Sukhmur and 50 buses will be available | मुंबई-पुणे प्रवास होणार सुखकर, ५० बसेसमध्ये वाय-फाय होणार उपलब्ध

मुंबई-पुणे प्रवास होणार सुखकर, ५० बसेसमध्ये वाय-फाय होणार उपलब्ध

Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १६ - मुंबई-पुणे मार्गावरील प्रवाशांचा प्रवास आणखी सुखकर व्हावा यासाठी या मार्गावरील जवळपास ५० बसमध्ये वायफाय बसवण्यात येणार असल्याची माहिती एसटी प्रशासनाने दिली आहे. शिवनेरी, हिरकणी व इतर साध्या बसमध्ये येत्या १० ते १५ दिवसांत ही सुविधा उपलब्ध होणार असून त्याला मिळणारा प्रतिसाग पाहून अन्य बसमध्ये ही सेवा सुरू करण्यात येणार आहे. 
प्रवाशांचा एसटी प्रवास सुखकर व आनंददायी होण्याच्या दृष्टीने प्रवाशांना व्यक्तीगत मनोरंजनासाठी  वाय-फायच्या सहाय्याने प्रवासात मोबाईलवर  चित्रपट, गाणी, तसेच बातम्या ऐकण्यास व पाहण्यास मिळतील. मुंबई-पुणेसह पुण्यातून अन्य मार्गावर धावणा-या बसचाही यात समावेश आहे.

Web Title: Available for Wi-Fi in Mumbai-Pune journey, Sukhmur and 50 buses will be available

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.