गणेश रुपातील १०० चित्रे साकारणारा अवलिया
By Admin | Published: August 26, 2016 08:07 PM2016-08-26T20:07:55+5:302016-08-26T20:07:55+5:30
पंढरपूर हे संत सज्जनांचे माहेरघऱ या संत सज्जनांच्या रसाळवाणीतून आजही सा-या विश्वाची आचार, विचारांची तहान भागविली जाते़ आज अभिमानाने सांगावित अशी अनेक व्यक्ती
>- प्रभू पुजारी
पंढरपूर, दि. 26 - पंढरपूर हे संत सज्जनांचे माहेरघऱ या संत सज्जनांच्या रसाळवाणीतून आजही सा-या विश्वाची आचार, विचारांची तहान भागविली जाते़ आज अभिमानाने सांगावित अशी अनेक व्यक्ती जन्मून कला, साहित्य क्षेत्रात पंढरपूरची एक वेगळी ओळख साºया जगाला दाखवून दिली आहे. त्यातीलच एक म्हणजे चित्रकार भारत गदगे होय.
पायात चप्पल नाही़, पाठीवर फाटकं दफ्तर, कपडे त्यातल्या त्यात बरे, मनात शिक्षणाची जिद्द़़़ वडील पंढरपूरमध्ये उत्कृष्ट पेंटर त्यामुळे कला उपजतच होती़ ब-याच प्राथमिक गोष्टी पाहून शिकलेल्या वेळोवेळी शिक्षकांचे मिळालेले मार्गदर्शन अन् मित्रांचे प्रोत्साहऩ़़ या बळावर मुंबईला जाऊन कलाशिक्षणाची उच्च पदवी प्राप्त करायचीच हा ध्यास पंढरपूर, सांगली, पुणे आणि मुंबई असा प्रवास करीत अखेर कलेतील पदव्युत्तर पदवी संपादन केली़. यानंतर मोठ्या शहरात व्यवसाय करता आला असता पण ‘गड्या आपला गावच बरा’ म्हणून पुन्हा पंढरपूर गाठले़ येथील लोकमान्य महाविद्यालयात कलाशिक्षक म्हणून रुजू झालो़ दरम्यान दिवसरात्र काम करून दोन पेटिंगची कामे केली़. यातील ‘विठू माझा लेकुरवाळा’ या कलाकृतीने तर उच्च शिखरावर नेऊन बसविले़ त्यानंतर शिवराज्याभिषेक सोहळा, तुळजाभवानी मातेचे तयार केलेले मेटल पेंटींग, श्री शाकंभरी देवीचे पेंटींग याशिवाय विविध रुपातील १०० गणेशांच्या मूर्ती पेंटींग केल्या आहेत़ त्याचेच ‘विघ्नहर्ता कला प्रदर्शन’ पंढरपुरात २७ ते ३१ आॅगस्ट या कालावधीत टिळक स्मारक मंदिर येथे भरविले जाणार आहे.
भारत गदगे यांनी हाताळलेले प्रकार
भारत गदगे यांनी कला क्षेत्रात म्युरल पेंटिंग, मेटल, लँडस्केप, पोर्ट्रेटस्, फोटोग्राफी, फायबर ग्लास पेंटिंग, मिनिचर पेंटिंग, कॅनव्हास पेंटिंग आदी प्रकारात चित्रे साकारली आहेत़ त्यांच्या या कलेची दाद घेत विविध संस्था, संघटना, राज्य शासन यांनी ७४ पुरस्काराने सन्मानित केले आहे.
हे आहेत फायबर मूर्ती संग्रहाक
राष्ट्रपती प्रणब मुखर्जी, प्रतिभाताई पाटील, के़ शंकरनारायण, शरद पवार, बाळासाहेब ठाकरे, सय्यद हैरद रझा, एम़ एफ़ हुसेन, पं़ हरिप्रसाद चौरसिया, पंडित जसराज, पंडित शिवकुमार शर्मा, श्रीश्रीश्री रविशंकर, भैय्यू महाराज, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी भारत गदगे यांनी साकारलेली स्वयंभू पांडुरंगाची प्रासादिक फायबर मूर्ती संग्रह करून ठेवली आहे.