संत व्हॅलेंटाइनचा अवतार !

By admin | Published: February 13, 2016 10:36 PM2016-02-13T22:36:33+5:302016-02-13T22:36:33+5:30

माझ्या मते संत व्हॅलेंटाइन हा एकमेव संत असेल ज्याने अभंग म्हटले नाहीत. कसलेही चमत्कार केले नाहीत किंवा त्याच्यावर कुठलीही मालिकासुद्धा आली नाही; आणि तरीही त्याची जयंती कॅलेंडरवर

Avatar of Saint Valentine! | संत व्हॅलेंटाइनचा अवतार !

संत व्हॅलेंटाइनचा अवतार !

Next

(महिन्याचे मानकरी)

- अंबर विनोद हडप

माझ्या मते संत व्हॅलेंटाइन हा एकमेव संत असेल ज्याने अभंग म्हटले नाहीत. कसलेही चमत्कार केले नाहीत किंवा त्याच्यावर कुठलीही मालिकासुद्धा आली नाही; आणि तरीही त्याची जयंती कॅलेंडरवर न लिहितासुद्धा अवघा तरुण संप्रदाय भक्तिभावाने साजरी करतो. त्यापैकीच एक पप्पू. आपण वयात आलो याचा त्याला शोध लागला; आणि त्याने ठरवून टाकले की जसे पुराणकथांमध्ये लोक भगवान शंकराला प्रसन्न करून घेत, तसे आपण व्ह^ॅलेंटाइन या प्रेमदेवतेला प्रसन्न करायचे. यासाठी त्याला फार मेहनत नाही घ्यावी लागली. एटीएमला जसा पिन नंबर असतो तसा व्हॅ^लेंटाइन देवतेचा एक पिन कोड असतो ‘आय लव यु’. पप्पूने या जपाला सुरूवात केली. आणि पप्पूला व्ह^ॅलेंटाइन पावला आणि प्रकट झाला.
जणूकाही आपला बाप एखाद्या गिफ्ट शॉ^पचा मालक झाल्याप्रमाणे पप्पूने आॅ^डर दिली, मला ४ मोठे सॉफ्ट टॉ^य आणि दोन परफ्युमच्या बॉ^टल्स देना. व्ह^ॅलेंटाइनने विचारले, कशाला? पप्पू म्हणाला, कशाला म्हणजे? तू व्हॅ^लेंटाइन आहेसना. त्यावर व्हॅ^लेंटाइन म्हणाला, मग मी काय करू? पप्पू म्हणाला, प्रेम असले तर तुझ्या जयंतीच्या दिवशी हे सगळे द्यावे लागते बाबा. त्यासाठी चार दिवस आधीपासून फिल्डिंग लावावी लागते. नाहीतर, त्याला गर्लफ्रेण्ड ‘प्रेम’ म्हणत नाही.
व्हॅ^लेंटाइन हसला आणि म्हणाला, पण माझ्याकडे पैसे नाहीयेत. पप्पू म्हणाला, मग एक काम कर. माझी नवी सेटिंग करून दे. व्हॅ^लेंटाइन म्हणाला, म्हणजे काय करू? तो म्हणाला, जुनीचा कंटाळा आला यार. आता नव्या मुलीबरोबर टाका दे ना भिडवून. तू तर व्ह^ॅलेंटाईन आहे यार. तू सगळा झोल करू शकतोस. व्हॅ^लेंटाइनने विचारले, अरे मी काय टाका भिडवणारा वाटलो का? आधीची - नंतरची हा काय प्रकार आहे? पप्पू म्हणाला, शाळेत कधी एका इयत्तेत बसतो का आपण? ‘नाय’. पाचवीतली टीचर कितीपण आवडली तरी सहावीत जावेच लागते ना टीचरला सोडून, तसेच गर्लफ्रेण्डचे असते. अनुभव महत्त्वाचा. बरे चल, काय नाय तर प्रेमाच्या टीप्स तर दे. व्हॅ^लेंटाइन म्हणाला, मनापासून प्रेम कर. बाकी काही नाही; आणि घाई करू नको. बरे चल, मी टीप देतो. पण मला जरा फिरायचेय.
पप्पू म्हणाला, चल बस बाईकवर. एका गार्डनजवळ आले. तिथे झुडपांच्या मागे काही चुंबनदृश्ये व्हॅ^लेंटाइनने पाहिली आणि विचारले, हे काय? पप्पू म्हणाला, फिल्म. व्हॅ^लेंटाइन म्हणाला, हे असं उघड्यावर? त्यावर पप्पू म्हणाला, तू याददाश्त गेलेला व्हॅ^लेंटाइन नाय ना? का ‘श्यामची आई’मधला श्याम हायेस? प्रेमात हे असे होतेच. व्हॅ^लेंटाइन म्हणाला, पण हे प्रेम नाहीये, हे प्रेम प्रदूषण आहे.
दोघे निघाले आणि मग कधी सिनेमाच्या पोस्टरवर कधी चित्रपटगृहात, कधी एकांतात तर कधी गर्दीत प्रेम ह्या पवित्र नावाखाली अनेक प्रेमोरेबल गोष्टी पाहिल्या. एकतर्फी प्रेमातले बदले पाहिले. प्रेमातली भांडणे बघितली आणि हे सगळे चालू असताना पप्पू त्याला रनिंग का^ॅमेंट्री देत होता.
संध्याकाळ झाली तसे एक राडा पाहिला. ज्यात कोणा राजकीय पक्षाचा एक माणूस एक गिफ्ट शॉप फोडत होता. का तर हा परकीय सण इथले लोक मोठ्या उत्साहात साजरा करीत आहेत. व्हॅ^लेंटाइन म्हणाला, हे काय? पप्पू म्हणाला, हे नेहमीचे आहे. व्हॅ^लेंटाइन म्हणाला, प्रेमाला कसल्या देशाच्या मर्यादा. प्रेम जगातले सगळे करतात. पप्पू म्हणाला, पण हे ‘असे’ प्रेम आवडत नाही. राडा करणाऱ्यांना व्हॅ^लेंटाइन म्हणाला, पण मी कुठेच असे लिहून ठेवले नाहीये की असेच प्रेम करा म्हणून. या तरुणांमध्ये मी प्रतिज्ञेमधले माझ्या देशावर माझे प्रेम आहे असे म्हणणारी एकही व्यक्ती नाही पाहिली. प्रेमात गुंता असू शकतो, पण म्हणून प्रेमालाच नावे ठेवणारे आपण कोण?
प्रेम ही गोष्ट देवाने माणसांना, प्राण्यांना, सगळ्यांना दिली आहे. आपण ह्या दिवशी माणूस होऊन अमानुष होतो आणि प्राणी माणुसकीने प्रेम करतात; आणि तेही वर्षाचे १२ महिने. प्रेमात खर्च महत्त्वाचा नाही. प्रेमात स्पर्शही महत्त्वाचा नाही. प्रेमात महत्त्वाचे आहे समजून घेणे. सगळ्या संतांनी, देवांनी प्रेम करा असेच सांगितले. तुम्ही प्रेमाच्या ब्रॅण्डखाली सगळ्याच भावनांची सुपरमार्केट उघडलीत. कधीतरी काहीही न देता आणि न घेता ‘आय लव यु’ म्हणून बघा.
हे बोलून व्हॅ^लेंटाइन दिसेनासा झाला आणि पप्पू व्हॅ^लेंटाइनने सांगितलेले लोकांना सांगू लागला. बघा तुम्ही ही व्हॅ^लेंटाइन जयंती वेगळ्या पद्धतीने साजरी करून. संत व्ह^ॅलेंटाइनचा अवतार बनून.
(लेखक ‘बालक-पालक’, ‘यलो’, ‘बाळकडू’, ‘बंध नायलॉनचे’ या चित्रपटांचे आणि ‘असंभव’, ‘फू बाई फू’, ‘का रे दुरावा’, ‘घर श्रीमंताचे’, ‘आंबट गोड’ आणि ‘सारेगमप’ या मालिकांचे लेखक आहेत.)

Web Title: Avatar of Saint Valentine!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.