दरमहा सरासरी ३०० दुर्घटना
By admin | Published: January 18, 2017 06:16 AM2017-01-18T06:16:56+5:302017-01-18T06:16:56+5:30
मुंबईतील जुन्या चाळी आणि इमारतींमधील ४० वर्षे जुन्या सदोष वायरिंगने अपघातांचा धोका वाढवला आहे.
मुंबई : मुंबईतील जुन्या चाळी आणि इमारतींमधील ४० वर्षे जुन्या सदोष वायरिंगने अपघातांचा धोका वाढवला आहे. ही धक्कादायक बाब अग्निशमन दलाच्या अहवालातून समोर आली आहे. २०१६ मध्ये दरमहा सरासरी ३००-३५० दुर्घटना घडल्या आहेत. ही बाब शहरासाठी धोक्याची घंटा आहे.
सप्टेंबर महिन्यात सर्वाधिक ५५० दुर्घटना घडल्या. यामध्ये आठजण मृत्युमुखी तर ३९ जखमी झाले. प्रत्येक महिन्यात दोनशे ते अडिचशे दुर्घटना घडतात. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये दुर्घटनेचे प्रमाण वाढले आहे. या अहवालानुसार सप्टेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात २९६ दुर्घटना घडल्या. बहुतांश आगी मागचे कारण शॉर्ट सर्किट असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. घर पडणे, झाड कोसळणे, नाल्यासह समुद्रात बुडणे अशा दीडशे घटना, असे अपघात दर महिन्याला घडत असतात. शहरातील दुर्घटनांचे हे प्रमाण लक्षात घेता अशा घटना
कमी होण्यासाठी लोकांमध्ये जागरुकता निर्माण करण्याची गरज असल्याचे मत तज्ज्ञ व्यक्त करत आहेत (प्रतिनिधी)