‘निल बटे सन्नाटा’ सरासरी तर ‘जंगल बुक’ सुपरहिट

By Admin | Published: April 26, 2016 02:55 AM2016-04-26T02:55:07+5:302016-04-26T02:55:07+5:30

गेल्या शुक्रवारी प्रदर्शित झालेल्या नील बटे सन्नाटा या चित्रपटाला समीक्षकांनी गौरविले, तसेच जंगल बुक चित्रपटाची वाटचाल सुपरहिटकडे झाली

On average, 'Jungle Book' Super Hit | ‘निल बटे सन्नाटा’ सरासरी तर ‘जंगल बुक’ सुपरहिट

‘निल बटे सन्नाटा’ सरासरी तर ‘जंगल बुक’ सुपरहिट

googlenewsNext

गेल्या शुक्रवारी प्रदर्शित झालेल्या नील बटे सन्नाटा या चित्रपटाला समीक्षकांनी गौरविले, तसेच जंगल बुक चित्रपटाची वाटचाल सुपरहिटकडे झाली. नील बटे... या चित्रपटाने लालरंग, संता-बंता या चित्रपटांपेक्षा सर्वाधिक
१.७५ कोटींची कमाई केली. प्रेक्षकांच्या सकारात्मक प्रतिक्रियांमुळे या चित्रपटाला आणखी प्रेक्षक मिळतील, अशी आशा व्यक्त केली जात आहे. दिल्ली, उत्तर प्रदेश आणि इतर अनेक राज्यांत करमुक्त झाल्याचाही या चित्रपटाला फायदा झाला. तर नव्या चित्रपटांपैकी कोणताही चित्रपट बॉक्स आॅफीसवर टिकू शकला नाही. रणदीप हुड्डाच्या चित्रपट लाल रंगने पहिल्या तीन दिवसांची कमाई १.७५ कोटी रुपयेकेली. आकाशदीप दिग्दर्शित संता-बंता प्रा.लि.ची अवस्था वाईट झाली. हा चित्रपट पहिल्या तीन दिवसांत केवळ ५५ लाख रुपये कमवू शकला. मुंबईसह अनेक शहरांत या चित्रपटावर सरकारने बंदी घातली आहे. शीख समुदायाचा एक गट या चित्रपटाला विरोध करीत होता. पंजाबमध्ये संता-बंतावर बंदी घालण्यात आली.
यापूर्वी प्रदर्शित झालेल्या चित्रपटांबाबत बोलायचे झाले, तर यशराज निर्मित शाहरुख खानच्या चित्रपट फॅनला अपयशाचे धनी व्हावे लागले. पहिल्या १० आठवड्यांत या चित्रपटाने ८० कोटींच्या आसपास जरूर व्यवसाय केला, मात्र शाहरुख खानचा चित्रपट असल्याच्या दृष्टीने याला खूप चांगला व्यवसाय म्हणता येणार नाही. दिलवालेनंतर शाहरुख खानला हा दुसरा धक्का आहे.
बॉक्स आॅफीसवर सध्या एकच चित्रपट धूम करीत असून, तो म्हणजे जंगल बुक. १०० कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश केलेल्या या चित्रपटाने आतापर्यंत १४५ कोटी रुपयांहून अधिक व्यवसाय केला असून, तो हॉलीवूडच्या भारतात प्रदर्शित चित्रपटांत सर्वाधिक मानला जात आहे. या चित्रपटाला आजही प्रेक्षकांची गर्दी आहे.
येणाऱ्या शुक्रवारी जॅकी श्रॉफचा मुलगा टायगरचा दुसरा चित्रपट बागी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात श्रद्धा कपूर त्याची नायिका आहे. टायगरचा हीरोपंती चित्रपट बनविणाऱ्या शब्बीर खान यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. निर्माता साजिद नाडियादवाला
यांनी बागीचा जोरदार प्रचार केला असून, अ‍ॅक्शन आणि रोमान्स असलेल्या या चित्रपटाकडून बॉलीवूडला खूप अपेक्षा आहेत.

Web Title: On average, 'Jungle Book' Super Hit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.