आॅगस्टमध्ये सरासरी कमीच

By admin | Published: August 26, 2015 02:27 AM2015-08-26T02:27:50+5:302015-08-26T02:27:50+5:30

मंगळवारी मुंबईसह उपनगरांत पावसाने दमदार हजेरी लावली असली तरीदेखील आॅगस्ट महिन्यात सरासरीच्या तुलनेत कमी पावसाची नोंद झाली आहे. आॅगस्ट महिन्यात पावसाची

Average low in August | आॅगस्टमध्ये सरासरी कमीच

आॅगस्टमध्ये सरासरी कमीच

Next

मुंबई : मंगळवारी मुंबईसह उपनगरांत पावसाने दमदार हजेरी लावली असली तरीदेखील आॅगस्ट महिन्यात सरासरीच्या तुलनेत कमी पावसाची नोंद झाली आहे. आॅगस्ट महिन्यात पावसाची सरासरी नोंद ५२९.७ मिलीमीटर अपेक्षित असते. परंतु यावर्षी ही नोंद १०९.७ मिलीमीटर एवढीच झाल्याचे स्कायमेटने म्हटले आहे.
जून महिन्यात पावसाने मुंबईत जोरदार खाते उघडले. जून महिन्यात साधारणत: ५२३ मिलीमीटर एवढा पाऊस पडतो. यावर्षी जून महिन्यात मुंबईत १ हजार १७४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. ही आतापर्यंतची सर्वाधिक नोंद आहे. तर जुलै महिन्याच्या सुरुवातीला पावसाचा जोर ओसरला. जुलै महिन्यात मुंबईत सरासरी ८०० मिलीमीटर पाऊस पडतो. परंतु यावेळी जुलै महिन्यात केवळ ३५९ मिलीमीटर पावसाची नोंद झाली.
सांताक्रूझ वेधशाळेत आॅगस्ट महिन्यात १०९.७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. प्रत्यक्षात आॅगस्ट महिन्यात पावसाची सरासरी नोंद ५२९.७ मिलीमीटर एवढी असते. नोंदीनुसार ६ आॅगस्टला २२ मिमी, १७ आॅगस्टला १२ मिमी आणि १८ आॅगस्टला ११ मिमी पाऊस पडला आहे. पश्चिम किनारा आणि मुंबईत कमी दाबाच्या पट्टयामुळे मुंबईत चांगला पाऊस पडतो. परंतु या कालावधीत या ठिकाणी कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले नाही. परिणामी पावसाचा जोर ओसरला, असे स्कायमेटचे म्हणणे आहे.

Web Title: Average low in August

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.