नाशिकमध्ये वैमानिकांना ‘एव्हिशन विंग’ प्रदान
By Admin | Published: May 17, 2015 01:15 AM2015-05-17T01:15:05+5:302015-05-17T01:15:05+5:30
एव्हिएशनच्या २३व्या प्रशिक्षण सत्रातील सर्व अधिकाऱ्यांनी कठोर परिश्रम घेत लढाऊ वैमानिकाचे प्रशिक्षण पूर्ण केले असून, ही अत्यंत गौरवास्पद बाब आहे.
एव्हिएशनच्या २३व्या प्रशिक्षण सत्रातील सर्व अधिकाऱ्यांनी कठोर परिश्रम घेत लढाऊ वैमानिकाचे प्रशिक्षण पूर्ण केले असून, ही अत्यंत गौरवास्पद बाब आहे. देशसेवा करताना कौशल्याच्या बळावर नव्या आव्हानांचा सामना करत वैभवशाली कामगिरीने लक्ष वेधून घ्या, असे मिलिटरी आॅपरेशनचे महासंचालक अतिविशिष्ट सेवापदक विजेते लेफ्टनंट जनरल पी. आर. कुमार यांनी येथे केले.
वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांच्या हस्ते ४३ वैमानिक जवानांना ‘एव्हिएशन विंग’ प्रदान करण्यात आली.
गांधीनगर येथील ‘कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूल’च्या आवारात झालेल्या २३व्या वर्गाच्या निरोप समारंभाप्रसंगी कुमार बोलत होते. ते म्हणाले, आर्मी एव्हिएशन हा सैन्यदलाचा कणा आहे. दरम्यान, १७ आठवड्यांचे लढाऊ वैमानिकाचे प्रशिक्षण घेत असताना सर्व स्तरातून अष्टपैलू कामगिरी करणारे कॅप्टन निखिलेश साहू यांना ‘सिल्व्हर चित्ता’ स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले.