सतर्कतेमुळे टळला अतिप्रसंग

By Admin | Published: December 15, 2014 04:06 AM2014-12-15T04:06:24+5:302014-12-15T04:06:24+5:30

एका १०वर्षीय चिमुरडीच्या प्रसंगावधानतेमुळे तिच्यावर ओढावणारा अतिप्रसंग टळल्याची धक्कादायक घटना भांडुपमध्ये घडली

Avoiding too much caution due to alertness | सतर्कतेमुळे टळला अतिप्रसंग

सतर्कतेमुळे टळला अतिप्रसंग

googlenewsNext

मुंबई : एका १०वर्षीय चिमुरडीच्या प्रसंगावधानतेमुळे तिच्यावर ओढावणारा अतिप्रसंग टळल्याची धक्कादायक घटना भांडुपमध्ये घडली. या प्रकरणी ४७ वर्षीय अनिल किल्ले या नराधम शिक्षकास भांडुप पोलिसांनी विनयभंगाच्या गुन्ह्यात अटक केली आहे. शिक्षकपेशाला खालच्या स्तरावर नेऊन ठेवणाऱ्या या शिक्षकाच्या या कृत्याची आज दिवसभर परिसरात चर्चा घडत होती.
भांडुप पश्चिमेकडील जंगलमंगल रोड येथील एका उच्चभ्रू इमारतीच्या अकराव्या मजल्यावर चिनू (नाव बदलले आहे) आई वडिलांसह राहण्यास आहे. त्याच इमारतीच्या आठव्या मजल्यावर किल्ले राहण्यास आहे. आज सायंकाळी साडेसातच्या सुमारास चिनू आठव्या मजल्यावरील लहान मुलांसोबत नेहमीप्रमाणे खेळण्यास आली होती. त्याचदरम्यान किल्लेच्या घरात एक लहान मुल झोपलेले दिसले, म्हणून ती त्याला पाहात राहिली. दरम्यान नराधम किल्लेची नजर चिनूवर पडली आणि त्याने चिनूला टीव्ही बघायला ये असे सांगितले. चिनूने घरात प्रवेश करताच या नराधमाने घराची आतून कडी लावून चिनूसोबत अश्लील चाळे करण्यास सुरुवात केली. मात्र चिनूने वेळीच प्रसंगावधान साधून ओरड घालण्यास सुरुवात केली. अशात चिनूच्या आरडाओरडाने शेजारचे जागे होतील, या भीतीने तत्काळ किल्लेने दरवाजा उघडला. तोच चिनूने हंबरडा फोडत आईकडे धाव घेतली. चिनूने झालेला प्रकार सांगताच तिच्याही पायाखालची जमीन सरकली.
आईने तत्काळ पोलीस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधत गुन्ह्याची माहिती दिली. भांडुप पोलिसांना याची माहिती मिळताच पोलिसांनी चिनूच्या घराकडे धाव घेत आरोपीच्या मुसक्या आवळल्या. (प्रतिनिधी)

Web Title: Avoiding too much caution due to alertness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.