जळगावात अवतरले शिवराज्य

By admin | Published: February 19, 2017 01:46 PM2017-02-19T13:46:50+5:302017-02-19T13:46:50+5:30

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्यावतीने काढण्यात आलेल्या भव्य दिव्य मिरवणुकीने शहरवासीयांच्या

Avtarale Shivrajya in Jalgaon | जळगावात अवतरले शिवराज्य

जळगावात अवतरले शिवराज्य

Next

ऑनलाइन लोकमत
जळगाव, दि. 19 : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्यावतीने काढण्यात आलेल्या  भव्य दिव्य मिरवणुकीने शहरवासीयांच्या डोळ््यांचे पारणे फिटले.  शिवराज्य कारभाराचे दर्शन घडविणाऱ्या चित्ररथांच्या माध्यमातून शहरात जणू शिवराज्यच  अवतरले होते. अत्यंत शिस्तबद्ध व पारंपरिक पध्दतीच्या

नृत्य, लेझीम पथकांचा तसेच सर्व जाती धर्माचा, पक्षांचा, संस्थांचा समावेश हे  मिरवणुकीचे वैशिष्ट ठरले. 
बदलत्या सामाजिक परिस्थितीत धार्मिक आणि जातीय सलोखा काळाची गरज बनली आहे. त्या अनुषंगाने  शिवजयंती निमित्त सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येऊन अनोखा सलोखा जपण्याचा संकल्प सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्यावतीने करण्यात आला होता. त्यानुसार या उत्सवाला रविवारी सकाळी छत्रपती श्री शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुलापासून सुरूवात झाली. या ठिकाणी माजी मंत्री सुरेशदादा जैन, आमदार सुरेश भोळे,  महापौर नितीन लढ्ढा, मनपा आयुक्त जीवन सोनवणे, सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष तथा जैन उद्योग समुहाचे अध्यक्ष अशोक जैन, माजी महापौर विष्णू भंगाळे, माजी उपमहापौर करीम सालार, नगरसेवक नरेंद्र पाटील, प्रा. डी.डी. बच्छाव, अ‍ॅड. विजय भास्कर पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष गफ्फार मलिक, मराठा सेवा संघाचे केंद्रीय समिती सदस्य सुरेंद्र पाटील, डॉ. प्रताप जाधव, नगरसेवक कैलास सोनवणे, डॉ. राधेश्याम चौधरी, शंभू पाटील, गजानन मालपुरे, फारुक शेख, शिवाजीराव भोईटे, गिरीश कुळकर्णी, प्रा. सुनील गरूड, बबलू तडवी आदी उपस्थित होते. मान्यवरांच्याहस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्धाकृती पुतळ््याचे पूजन करण्यात येऊन भव्य मिरवणुकीस प्रारंभ झाला. 

माता जिजाऊ, शिवबांचे दर्शन....
अग्रभागी शिवरायांचा अर्धाकृती पुतळा उघड्या जीपमध्ये ठेवण्यात आला होता. याच जीपवर लावण्यात आलेले छत्रपतींची आकर्षक प्रतिमा सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. या जीपमागे माता जिजाऊ, छत्रपती शिवराय आसनस्थ असलेले घोडे, उंट व त्यांच्या मागे मावळे, भालेदार पठाण असा सजीव देखावा साकारण्यात आला होता.  

छत्रपतींच्या पुतळ््यास पुष्पहार अर्पण
मिरवणुकीदरम्यान शिवतीर्थ मैदानानजीक छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या पुतळ््यास महापौर नितीन लढ्ढा व मनपा आयुक्त जीवन सोनवणे यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करण्यात येऊन मिरवणूक पुढे मार्गस्थ झाली. 

मान्यवरही पायी सहभागी
या भव्य मिरवणुकीत माजी मंत्री सुरेशदादा जैन हे नेहरु चौकापर्यंत पायी सहभागी झाले होते तर इतर मान्यवर मिरवणुकीच्या शेवटपर्यंत पायीच सहभागी झाले होते. 

आगळी वेगळी संकल्पना
शिवजयंतीची सुरूवातीपासूनच वेगळी संकल्पना ठेवण्यात आली होती. यामध्ये रयतेचा राजा, महिलांचा रक्षणकर्ता, शेतकऱ्यांचा कैवारी, कुळवाडी भूषण राजा अशी संकल्पना यंदा ठेवण्यात आली व त्याचे प्रतिबिंब या मिरवणूकीत दिसून आले. सोबतच संत, राष्ट्रीय पुरुषांचे छायाचित्र चित्ररथांवरून झळकत होते. 

जयघोषाने दणाणले शहर
या मिरवणूकीसह शहरात सकाळपासूनच वेगवेगळ््या भागात शिवरायांचा तसेच माता जिजाऊ यांचा जयजयकार करण्यात येत होता. या जयघोषाने शहर दणाणले होते. शहरातील विविध रस्त्यांवर दुचाकीस्वार तरुण हाती भगवा ध्वज घेत छत्रपतींचा जयजयकार करीत प्रचंड उत्साह दिसून येत होता. 

महिलांचा लक्षणीय सहभाग...
 मिरवणुकीत महिलांचा सहभाग लक्षणीय होता. वेगवेगळ््या माध्यमाच्या विविध शाळा, महाविद्यालयाचे विद्यार्थी, विद्यार्थिनीदेखील मोठ्या संख्येने मिरवणुकीत सहभागी झाल्या होत्या. विशेष म्हणजे महिला, तरुणींनी भगवे फेटे परिधान केले होते. 

केळी, सरबत, पाणी वाटप 
मिरवणुकीदरम्यान विविध संस्थांच्यावतीने केळी, सरबत व पाण्याचे पाऊच वाटप करण्यात आले.  

अरे माझा शिवबा जन्मला
शिवनेरीवर तोफांचा गडगडाट झाला... , सनई-चौघडे वाजू लागले..., सारे आनंदी-आनंदी वातावरण पसरले...,भगवा अभिमानाने फडकू लागला..., सह्याद्री आकाशाच्या उंचीने दिल्लीकडे ताठ नजरेने पाहू लागली..., अवघा दक्खन मंगलमय झाला.., अन एक आरोळी सह्याद्रीच्या कडेकोपर्यात घुमली.... ह्यअरे माझा राजा जन्मला..., माझा शिवबा जन्मला ..., दीन-दलितांचा कैवारी जन्माला..., दृष्टांचा संहारी जन्मला..., अरे माझा राजा जन्मला...ह्ण  या ओळींची आठवण करून देणारा प्रसंगच जळगाव शहरात या भव्य-दिव्य मिरवणुकीने उभा केला होता. <

Web Title: Avtarale Shivrajya in Jalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.