अंधत्वावर मात व नेत्रदान जागृतीसाठी नवी मुंबईकरांचे वॉकेथॉन
By admin | Published: January 7, 2017 02:38 AM2017-01-07T02:38:17+5:302017-01-07T02:38:17+5:30
रविवार, ८ जानेवारीला सकाळी ७.३० वाजता पामबीच मार्ग, सेक्टर १७, सानपाडा येथे वॉकेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे.
नवी मुंबई : ‘तमसो मा ज्योतिर्गमय’ या संकल्पनेनुसार अंधत्वावर मात करण्यासाठी, तसेच नेत्रदानाची प्रतिज्ञा करून नागरिकांमध्ये जनाजगृती करण्यासाठी रविवार, ८ जानेवारीला सकाळी ७.३० वाजता पामबीच मार्ग, सेक्टर १७, सानपाडा येथे वॉकेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. सतीश माथूर यांच्या हस्ते ध्वज दाखवून, ही वॉकेथॉन सुरू करण्यात येणार आहे. वॉकेथॉनमध्ये शेकडो डॉक्टर्स, शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि सामाजिक संस्था सहभागी होणार आहेत. या उपक्रमातंर्गत गरिबांकरिता शस्त्रक्रिया निधी गोळा केला जाणार आहे.
अॅडव्हान्स आय हॉस्पिटल अॅण्ड इन्स्टिट्यूट आणि वन व्हिजन हेल्थ अॅण्ड रिसर्च फाऊंडेशन, टिमजे यांच्या संयुक्त विद्यमाने नवी मुंबईत नेत्रदान जनजागृतीकरिता वॉकेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. अशा उपक्रमातून मागील वर्षी ५०० मोफत शस्त्रक्रिया करण्यात आल्या असून, ५००० पेक्षा अधिक ज्येष्ठ नागरिकांना मोफत चष्म्यांचे वाटप केले.
माध्यमातून नागरिकांना नेत्रदानाची प्रतिज्ञा घेतली जाणार असून, जास्तीत जास्त नागरिकांनी या वॉकेथॉनमध्ये सहभागी होण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे.