जागावाटपावरून होणार दमछाक

By admin | Published: July 27, 2014 02:14 AM2014-07-27T02:14:18+5:302014-07-27T02:14:18+5:30

शिवसेना-भाजपा युतीत सर्वकाही आलबेल असल्याचे चित्र रंगविले जात असले, तरी भाजपा आणि शिवसेना एकमेकांसाठी जागा सोडण्यापूर्वी मित्रपक्षांना सन्मानाने जागावाटप करतील,

Awakening will be tumbling on | जागावाटपावरून होणार दमछाक

जागावाटपावरून होणार दमछाक

Next
यदु जोशी - मुंबई 
शिवसेना-भाजपा युतीत सर्वकाही आलबेल असल्याचे चित्र रंगविले जात असले, तरी भाजपा आणि शिवसेना एकमेकांसाठी जागा सोडण्यापूर्वी मित्रपक्षांना सन्मानाने जागावाटप करतील, असे समन्वय समिती बैठकीनंतर नेत्यांनी जाहीर केले असले तरी स्वाभिमानी शेतकरी संघटना, रिपाइं, राष्ट्रीय समाज पक्ष आणि शिवसंग्राम यांनी वेळोवेळी केलेल्या मागण्या लक्षात घेता,  या चार पक्षांना मिळून किमान 9क् जागा हव्या आहेत. त्यामुळे मित्रपक्षांचे समाधान करताना भाजपा-सेनेची कसरत होणार आहे. 
लोकसभा निवडणुकीपूर्वी रामदास आठवले यांना राज्यसभेवर घेऊन त्यांचे समाधान करण्याचा प्रय} झाला असला, तरी मंत्रिपद मिळावे अशी त्यांची महत्त्वाकांक्षा आहे. तर दुसरीकडे स्वाभिमानीचे खा. राजू शेट्टी यांनाही मंत्रिमंडळात स्थान मिळावे, अशी त्यांच्या समर्थकांची मागणी आहे. त्यामुळे दोघांपैकी नेमके कोणाला मंत्रिपद द्यायचे, असा पेच भाजपासमोर आहे. निवडून येण्याची क्षमता हाच निकष लावून जागांचे वाटप झाले पाहिजे, असा भाजपा नेत्यांचा आग्रह आहे. त्याचा मोठा फटका लहान मित्रपक्षांना बसू शकतो. या निकषानुसार रिपब्लिकन पार्टीला तीन ते चारच जागा मिळू शकतील, तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेला फक्त आठ ते दहा जागा मिळतील. बारामतीतून लढत दिलेले महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाची स्थिती वेगळी नाही. शिवसंग्रामची पाटी अजून कोरीच आहे. दरम्यान, भाजपाला जागा वाढवून हव्या आहेत. त्यासाठी शिवसेनेशी संघर्ष होणो अटळ आहे. दुसरीकडे शिवसेना नेत्यांनी भाजपाचे प्रयत्न हाणून पाडण्यासाठी रणनीती आखल्याचे सूत्रंनी सांगितले. 
 
कोल्हापूर : लोकसभेतील यश केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळेच मिळाल्याचा कांगावा काही जण करतात. मग ही लाट कोल्हापूरसह कर्नाटक, केरळमध्ये का दिसली नाही, अशी विचारणा करत सन्मानाने जागावाटप झाले तर ठीक अन्यथा ‘स्वाभिमानी’चा ङोंडा घेऊन विधानसभा लढवू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी लगावला. 

 

Web Title: Awakening will be tumbling on

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.