विधीमंडळाची प्रतिमा बदलण्यासाठीच पुरस्कार सोहळा - विजय दर्डा

By admin | Published: August 3, 2016 06:41 PM2016-08-03T18:41:14+5:302016-08-03T20:18:08+5:30

लोकांमध्ये विधीमंडळाविषयी असलेली प्रतिमा बदलण्यासाठीच लोकमत विधीमंडळ पुरस्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आल्याचं लोकमत मीडिया प्रा. लि.चे चेअरमन विजय दर्डा यांनी सांगितलं आहे

Award for change in statue of the legislation - Vijay Darda | विधीमंडळाची प्रतिमा बदलण्यासाठीच पुरस्कार सोहळा - विजय दर्डा

विधीमंडळाची प्रतिमा बदलण्यासाठीच पुरस्कार सोहळा - विजय दर्डा

Next
>ऑनलाइन लोकमत - 
मुंबई, दि. 03 - विधीमंडळ व लोकप्रतिनिधींच्या कामकाजाविषयी लोकांमध्ये असलेली प्रतिमा बदलण्यासाठीच लोकमत विधीमंडळ पुरस्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आल्याचं लोकमत मीडिया प्रा. लि.चे  चेअरमन विजय दर्डा यांनी सांगितलं आहे. ‘लोकमत वृत्तपत्र समूहा’तर्फे विधानसभा आणि विधान परिषदेत सर्वोत्कृष्ट कार्य करणाऱ्या आमदारांना ‘लोकमत विधिमंडळ पुरस्कार’ देऊन गौरविण्यात येणार आहे. मान्यवरांनी दिपप्रज्वलन केल्यानंतर कार्यक्रमाला सुरुवात झाली. 
 
यावेळी बोलताना विजय दर्डा यांनी 'गोंधळ न होता सभागृहाचे काम कसे चालावे, चर्चा करून कसे काम करू शकतो, संसद असो किंवा विधान परिषद असो तिथे गोंधळ होतो आणि मग तिथं काही प्रस्ताव पास होतात. ही प्रतिमा बदलावी म्हणूनच हे पुरस्कार सुरु करण्यात आले आहेत', असं बोलले आहेत. 'नवीन पिढीचा या विषयीचा आदर कमी होऊ नये, प्रतिमा मलिन होऊ नये', असं मतही त्यांनी यावेळी व्यक्त केलं.
संसदीय कार्याच्या माध्यमातून देशाचे, समाजाचे कल्याण आणि जनतेच्या आशा-आकांक्षांना वास्तवात आणण्याचे काम होते. संसद आणि विधिमंडळाने लोककल्याणाचे मार्ग प्रशस्त करण्यासाठी अनेक महत्त्वाचे कायदे करण्याचे काम केले आहे, परंतु अलीकडच्या काळात संसद असो की, देशभरातील विधिमंडळे, यात विविध अंगाने चर्चा, सकस वादविवाद न होता सभागृह बंद पाडणे, चर्चा न होणे व गोंधळात विधेयके मंजूर करून घेणे, असे प्रकार सातत्याने घडताना दिसतात. समाजधुरिणांना, विचारवंतांना जशी याविषयी काळजी आहे तसेच कोट्यवधी जनतेला अपेक्षाभंगाचे दु:ख आहे. कारण सुसह्य जीवन जगण्यासाठी, अन्न-वस्त्र-निवारा या मूलभूत गरजांच्या पूर्ततेसाठी जनतेला याच सभागृहांकडून अपेक्षा आहेत. बेचैन असलेल्या तरुण पिढीचा सभागृहांविषयीचा आदर कमी होऊ नये या प्रामाणिक हेतूने या पुरस्कारांचे आयोजन ‘लोकमत’तर्फे करण्यात आले आहे.
 

Web Title: Award for change in statue of the legislation - Vijay Darda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.