पुरस्कारप्राप्त शिक्षकांना मिळणार 1 लाख

By admin | Published: September 5, 2014 01:58 AM2014-09-05T01:58:49+5:302014-09-05T01:58:49+5:30

राष्ट्रीय व राज्य शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांना दोन वेतनवाढीऐवजी 1 लाख रुपयांची रोख रक्कम देण्याचा निर्णय शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने घेतला आहे.

Awarded teachers will get 1 lakh | पुरस्कारप्राप्त शिक्षकांना मिळणार 1 लाख

पुरस्कारप्राप्त शिक्षकांना मिळणार 1 लाख

Next
मुंबई : राष्ट्रीय व राज्य शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांना दोन वेतनवाढीऐवजी 1 लाख रुपयांची रोख रक्कम देण्याचा निर्णय शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने घेतला आहे. शिक्षक दिनाच्या पूर्वसंध्येलाच शासनाने हा निर्णय घेऊन शिक्षकांचा यथोचित सन्मान केल्याने शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण परसले आहे.
 शिक्षकांना त्यांच्या अंगीकृत कामात प्रोत्साहन देण्याकरिता व त्यांच्या गुणांचा यथोचित सन्मान करण्याच्या उद्देशाने दरवर्षी शिक्षक पुरस्कार जाहीर केले जातात. 5 सप्टेंबरला शिक्षक दिनी पुरस्कार प्रदान करण्यात येतात. यंदा राष्ट्रीय व राज्य पुरस्कार मिळालेल्या प्राथमिक, माध्यमिक, आदिवासी विभागातील प्राथमिक शिक्षक, विशेष शिक्षक, अपंग शिक्षक आणि समाजसुधारक सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार मिळालेल्या शिक्षकांना दोन जादा वेतनवाढीऐवजी 1 लाख रोख रक्कम देण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. याबाबतचा अध्यादेश जारी केला आहे.
अध्यादेश जारी केल्यापासून याचा लाभ शिक्षकांना देण्यात येणार आहे. मात्र, यापूर्वी पुरस्कार मिळालेल्या शिक्षकांना याचा लाभ मिळणार नसल्याने त्यांना तो द्यावा, अशी मागणी शिक्षक भारतीचे अध्यक्ष अशोक बेलसरे यांनी केली आहे. तर या निर्णयाबद्दल शिक्षक आमदार रामनाथ मोते यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांचे आभार मानले आहेत. (प्रतिनिधी)
 
च्महापालिकेच्या वतीने शिक्षकांना दिल्या जाणा:या 2क्13-14 सालच्या 5क् महापौर पुरस्कारांची घोषणा गुरुवारी करण्यात आली. प्रत्येकी 1क् हजार रुपये रकमेचा धनादेश, मानचिन्ह आणि प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. शिवाय दोन राष्ट्रीय, चार राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षकांच्या नावांची घोषणाही करण्यात आली आहे.
च्मंगला राजाराम रसाळ आणि मंगल व्हटकर यांना राष्ट्रीय पुरस्कार घोषित झाले आहेत. तर माताचरण आर. मिश्र, धर्मराज खदेरु यादव, मुश्ताक अहमद जुबेर आणि रश्मी आर. लुकतुके यांना राज्य पुरस्कार घोषित झाले आहेत. या पुरस्कार विजेत्यांना 5 सप्टेंबर रोजी दिल्ली व पुणो येथे गौरविण्यात येणार आहे. 
च्सेवाकाळात उल्लेखनीय शैक्षणिक व सामाजिक कार्य केलेल्या महापालिका शाळांतील गुणवंत शिक्षकांना, मान्यताप्राप्त अनुदानित व विनाअनुदानित खासगी शाळांतील एकूण 5क् शिक्षकांना महापौर पुरस्कार प्रदान करण्यात येतात. माटुंगा येथील सिटी ऑफ लॉस एंजिलिस शाळेत 125 शिक्षकांच्या मुलाखती घेऊन त्यातून एकूण 5क् शिक्षकांची पुरस्कारांकरिता निवड करण्यात आली आहे. 
 
च्ठाणो : ठाणो व पालघर जिल्हा परिषदेद्वारे 5 सप्टेंबर शिक्षक दिन संयुक्तरीत्या साजरा केला जात आहे. पालकमंत्नी गणोश नाईक व राज्यमंत्नी राजेंद्र गावित यांच्या हस्ते जिल्ह्यातील प्राथमिक शाळेच्या 13 शिक्षकांना ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. 
 
च्यात जिल्ह्यातील प्राथमिक शाळेचे शिक्षक शहापूर येथील एकनाथ पवार, मुरबाडमधील शरद तुकाराम सूर्यराव, भिवंडीतील रमेश गांधले, अंबरनाथमधील बळवंत शेवाळे, कल्याणमधील निर्मला भिरु ड, तलासरीतील सोननाथ भोये, वसईतील विद्या पाठारे, वाडय़ातील रवींद्र हरड, मोखाडय़ातील सुनील वाणी, जव्हारमधील युवराज वाघ, डहाणूतील विमल चुरी, पालघरमधील विश्वनाथ संखे,
विक्र मगडमधील सुभाष भागडे आदींना शिक्षक पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. माध्यमिक शिक्षकांना
पुरस्कार द्यायचा की नाही या द्विधा मन:स्थितीत माध्यमिक शिक्षण विभाग आहे. 
च्या शिक्षकांना पुरस्काराने सन्मानित करण्यासाठी जिल्हा परिषदेची किंवा शासनाची तशी खास तरतूद नसल्यामुळे या पुरस्कार देण्यासंदर्भात उशिरार्पयत एकमत झालेले नाही. पण या पुरस्कारासाठी 11 शिक्षकांनी प्रस्ताव दिले आहेत. जिल्हा परिषदेच्या वर्तक सभागृहात सकाळी 11 वाजता पुरस्कार वितरण समारंभ पार पडणार आहे. 
 

 

Web Title: Awarded teachers will get 1 lakh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.