विद्युत मंडळाचा अजब कारभार

By admin | Published: May 17, 2016 01:49 AM2016-05-17T01:49:08+5:302016-05-17T01:49:08+5:30

रास्ता पेठेतील विद्युत मंडळाच्या महावितरण आणि महापारेषण या एका संस्थेच्या दोन कंपन्यांनी लिफ्ट वाटून घेतली आहे़

Awesome management of Electricity Board | विद्युत मंडळाचा अजब कारभार

विद्युत मंडळाचा अजब कारभार

Next


पुणे : रास्ता पेठेतील विद्युत मंडळाच्या महावितरण आणि महापारेषण या एका संस्थेच्या दोन कंपन्यांनी लिफ्ट वाटून घेतली आहे़ त्यातील एक लिफ्ट बंद पडल्याने दुसऱ्या कंपनीने आपली लिफ्ट थेट आपल्या कार्यालयाच्या तिसऱ्या मजल्यावर थांबण्याची सोय करून घेतली आहे़ त्यामुळे महावितरण कंपनीच्या कार्यालयात जाणाऱ्यांना ज्येष्ठ नागरिक, महिला यांना जिन्याचा वापर करावा लागत आहे़ एका इमारतीतील दोन कंपन्यांच्या या अजब कारभाराचा लोकांना त्रास सहन करावा लागत आहे़
रास्ता पेठेतील तीन मजली इमारतीतील पहिल्या दोन मजल्यांवर महावितरणाचे कार्यालय आहे़ या ठिकाणी नागरिकांचे सर्वाधिक काम असते़ त्यामुळे येथे नेहमी लोकांचा राबता असतो़ तिसऱ्या मजल्यावर महापारेषणचे कार्यालय आहे़ या इमारतीत २ लिफ्ट आहेत़ त्यांपैकी महावितरणच्या लिफ्टची मुदत संपल्यामुळे ती अनेक महिन्यांपासून बंद आहे़ यामुळे इतके दिवस सर्व नागरिक दुसऱ्या लिफ्टचा वापर करीत होते़ त्यामुळे महापारेषणच्या लिफ्टवर त्याचा ताण आला़ तेव्हा ही लिफ्ट तळमजल्यावरून पहिल्या व दुसऱ्या मजल्यावर न थांबता थेट तिसऱ्या मजल्यावर थांबेल, असा त्यात बदल करून घेण्यात आला आहे. त्यामुळे जिन्याचा वापर करण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही़ महावितरणच्या लिफ्टची मुदत संपल्याने सध्या ती बंद आहे़ त्यासाठी निविदा काढण्यात आली होती; पण त्याला प्रतिसाद मिळाला नाही़ पुनर्प्रक्रिया केली त्यालाही प्रतिसाद मिळाला नाही़ आता नव्याने पुन्हा निविदा काढणार असल्याचे सूत्रांनी सांगितले़
>दोन कंपन्यांमध्ये समन्वयाचा अभाव
पुणे जिल्हा विद्युत मंडळ समन्वयक समितीचे सदस्य चेतन आगरवाल यांनी सांगितले, की महावितरणला पुणे शहर हे सर्वांत जास्त महसूल देणारे असूनही जर मुख्य कार्यालयातच दोन कंपन्यांमध्ये समन्वय नसल्याने ज्येष्ठ नागरिक, महिला अपंग व्यक्ती, कर्मचाऱ्यांना त्रास होत असेल; लिफ्ट बंद, पाणी बंद होत असेल तर त्याला जबाबदार कोण? त्यांच्यातच समन्वय नसेल तर नागरिकांना चांगली सेवा कशी देणार, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे़

Web Title: Awesome management of Electricity Board

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.