भयानक - ठाण्यात एकाच कुटुंबातील १५ जणांची हत्या
By admin | Published: February 28, 2016 06:46 AM2016-02-28T06:46:54+5:302016-02-28T13:57:42+5:30
ठाण्यात घोडबंदर रोडवरील कासारवडवली येथे रहाणा-या अन्वर वडेकर यांच्या कुटुंबातील १५ जणांची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली.
Next
जितेंद्र कालेकर, ऑनलाइन लोकमत
मुंबई दि. २८ - ठाणे शहरात काळजाचा थरकाप उडवणारे भीषण हत्याकांड घडले आहे. ठाण्यात घोडबंदर रोडवरील कासारवडवली येथे रहाणा-या अन्वर वडेकर यांच्या कुटुंबातील १५ जणांची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. रात्री दोन ते तीनच्या सुमारास हे हत्याकांड घडले.
हस्नील अन्वर वरेकर असे आरोपीचे नाव असून, कुटुंबातील सदस्यांची हत्या केल्यानंतर त्याने स्वत:ही आत्महत्या केली. मृतांमध्ये सात मुले, सहा महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. हस्नीलने आई-वडिल, पत्नी आणि स्वत:च्या दोन मुलांचीही हत्या केली. मृतांमध्ये हस्नीलच्या बहिणीच्या पाच मुलांचा समावेश आहे. हस्नीलने पद्धतशीरपणे कट रचून हे हत्याकांड घडवल्याची शक्यता आहे. हस्नीलने सर्व बहिणींना घरी जेवणासाठी बोलावले होते. तो स्वत:हा जाऊन या बहिणींना घरी घेऊन आला होता.
UPDATE: Man allegedly killed 14 members of his family by slitting their throats after sedating them, later committed suicide in Thane (Maha)
— ANI (@ANI_news) February 28, 2016
या हत्याकांडातून बचावलेल्या सुबिया भरमल या बहिणीच्या गळयावर हस्नीलने सूरा फिरवला होता. मात्र तिने मृत झाल्याचे नाटक केल्यामुळे ती बचावली. हस्नील एकापाठोपाठ एक घरातील सदस्यांची हत्या करत असताना बचावलेल्या सुबियाने गपचुप दुस-या खोलीत जाऊन दरवाजा बंद करुन घेतला.खोलीतील खिडकीमधून तिने मदतीसाठी आरडाओरडा केल्यानंतर शेजा-यांनी तिला वाचवले आणि हे संपूर्ण हत्याकांड उघड झाले.
या हत्याकांडामध्ये हस्नीलची बहिण बचावली असून, तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. बचावलेल्या बहिणीकडून हत्याकांडाचे नेमके कारण समजेल असे पोलिसांनी सांगितले. कौटुंबिक वादातून ही घटना घडल्याचा संशय असून पोलीस त्या दिशेने तपास करत आहेत. संपूर्ण घरभर रक्ताचं थारोळं असून हत्या झालेल्यांमध्ये लहान मोठे सगळ्यांचा समावेश आहे. पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांच्यासह मोठ्या प्रमाणावर पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून, ते तपास करत आहेत. या सगळ्या जणांची हत्या चाकून करण्यात आली.
आरोपीने गळफास घेऊन आत्महत्या केली तेव्हा त्याच्या हातामध्ये चाकू होता. हस्नील इन्कम टॅक्स रिर्टन फाईल करणा-या एका कंपनीता कामाला होता. हस्नीलची कौटुंबिक पार्श्वभूमी चांगली होती. त्यांच्यामध्ये कौटुंबिक कलह नव्हता असे शेजा-यांनी पोलिसांना सांगितले. हस्नीलने जेवणामध्ये गुंगीचे औषध मिळवून हे हत्याकांड केले असाही संशय पोलिसांनी व्यक्त केला.
ठाणे हत्याकांड, मृतांची नावे
हस्नील अन्वर वरेकर वय -35 (मारेकरी), जबीन हुस्नील वरेकर 28 पत्नी, मुबतशिरा हस्नील वरेकर 6 मुलगी, उमेरा हस्नील वरेकर 3 महीने मुलगी, अन्वर वरेकर 65 वडील, असगडी अन्वर वरेकर 55 आई, शबीना शौकत खान 35 बहिण, अनस शौकत खान 12 भाची, सादिया शौकत खान 16 भाची, अलहिसन शौकत खान 5 भाचा, बतूल अन्वर वरेकर 30 बहिण, मारिया अरफान फक्की 28 बहिण, उमेर अरफान फक्की 7 भाचा, युसूफ अरफान फक्की 4 भाचा, आरसिया सोजेफ् भरमल 5 महीने भाची.
विडिओ जर्नालिस्टचा मृत्यू
ठाण्यातील हत्याकांडाच्या चित्रीकरणादरम्यान रतन भौमीक या विडिओ जर्नालिस्टचा हदयविकाराच्या झटक्याने मृत्यु झाला. सिविल रुग्णालयात मृतदेहांच्या चित्रीकरणादरम्यान हदयविकाराचा झटक्याने त्यांचा मृत्यू झाला.
आरोपी हस्नील वरेकर
There is only one survivor. We haven't recorded her statement yet as she is in a state of shock: Ashutosh Dumre pic.twitter.com/Oy45FTYeoW
— ANI (@ANI_news) February 28, 2016