आयाराम-गयारामांचे यशापयश

By Admin | Published: February 27, 2017 01:24 AM2017-02-27T01:24:50+5:302017-02-27T01:24:50+5:30

निवडणुकीचे बिगुल वाजताच संधीच्या शोधात अनेक इच्छुक पक्षांतर करतात.

Ayuram-Gauram's success | आयाराम-गयारामांचे यशापयश

आयाराम-गयारामांचे यशापयश

googlenewsNext


मुंबई : निवडणुकीचे बिगुल वाजताच संधीच्या शोधात अनेक इच्छुक पक्षांतर करतात. त्यांच्या प्रभागातील जनसंपर्कानुसार त्यांना तिकीट मिळते. पण सर्वच या जुगाडात नशीबवान ठरतातच असे नाही. या वेळी सर्वच मोठे पक्ष निवडणुकीच्या रिंगणात स्वतंत्र उतरल्याने इच्छुकांना अनेक पर्याय उपलब्ध झाले. यापैकी अनेकांनी सध्या चलतीत असलेल्या भाजपाला प्राध्यान्य दिले. भाजपाच्या तिकिटावर अनेकांना लॉटरी लागली, तरी काहींच्या पदरात अपयशच पडले.
पालिका निवडणुकीत शिवसेना, भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि मनसे स्वबळावर उतरले. या पक्षातील इच्छुकांच्या अपेक्षा वाढल्या आणि नाराजांच्याही. परिणामी, मोठ्या प्रमाणात बंडखोरी आणि पक्षांतर झाले. आजी-माजी नगरसेवक, काही माजी आमदारांनी पक्षांतर केले. काहींनी आपल्या पत्नीला तिकीट मिळण्यासाठी पक्षांतर केले. अशा २३पैकी १८ जण भाजपा आणि ५ शिवसेनेत गेले. भाजपात गेलेल्या १३ जणांना नगरसेवकपदाची लॉटरी लागली. शिवसेनेतील आयारामांचा पराभव झाला. (प्रतिनिधी)
काँग्रेसमधील
गयाराम ठरले लकी
काँग्रेसमधील गटातटांच्या राजकारणाला कंटाळून भाजपात गेलेल्या काँग्रेसवासींचे नशीब फळफळले. २०१४मधील भाजपाचे यश पाहून यापैकी अनेकांनी काँग्रेसमधून भाजपात उडी घेतली होती. काही दिवसांपूर्वीच भाजपा आणि शिवसेनेत उडी घेणारे आयाराम गयाराम कमनशिबी ठरले आहेत.
नशीब जोरात
२०१२मध्ये काँग्रेस नगरसेवक कमलेश यादव यांना पक्षाने तिकीट नाकारले. त्यामुळे २०१४मध्ये त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. गेली दोन वर्षे भाजपात असलेल्या यादव यांना पक्षाने यंदा उमेदवारी दिली. त्यांनी या संधीचे सोने केले. गेले २० वर्षे या प्रभागात भाजपाला स्थान मिळाले नव्हते. यादव यांच्या विजयाने प्रभाग क्रमांक ३१मध्ये कमळ फुलले आहे.
काँग्रेसच्या माजी नगरसेविका जया तिवाना यांना पक्षाने तिकीट नाकारल्यानंतर त्यांनी २०१४मध्ये भाजपामध्ये प्रवेश केला. त्यांच्या या सबुरीचे फळ त्यांना या निवडणुकीत मिळाले आहे.
शिवसेनेने नाकारल्याने भाजपात प्रवेश करणारे प्रभाकर शिंदे यांनाही पुन्हा एकदा नगरसेवक बनण्याचे स्वप्न साकार करता आले आहे. शिंदे यांनी सभागृह नेतेपद भूषवले आहे. त्यांनी शिवसेनेच्या तिकिटावर विधानसभा निवडणूकही लढवली आहे.
विजयी आयाराम
काँग्रेसमधून भाजपात आलेले सागर सिंह ठाकूर, प्रीतम पंडागळे, कमलेश यादव, जया तिवाना, ऋजुता समीर देसाई, श्रीकला पिल्ले हे विजयी ठरले़ तर शिवसेनेतून भाजपात आलेले हर्षिता नार्वेकर, मकरंद नार्वेकर, प्रभाकर शिंदे यांना मतदारांनी कौल दिला़
अपयश
मनसेचे नगरसेवक भाजपात प्रवेश - प्रकाश दरेकर, शिवसेनेचे भाजपात जाणारे बबलू पांचाळ, तेजस्विनी आंबोले, मनसेचे माजी आमदार मंगेश सांगळे, माजी विरोधी पक्षनेते देवेंद्र आंबेरकर, मनसेचे चेतन कदम यांच्या पत्नी भारती कदम, भाजपाचे शिवसेनेत प्रवेश करणारे मंगल भानुशाली, मनसेचे नगरसेवक भालचंद्र आंबुरे, मुकेश कारिया हे अपयशी ठरले़

Web Title: Ayuram-Gauram's success

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.