पाश्चात्त्य जगतात आयुर्वेद....
By admin | Published: July 19, 2015 01:20 AM2015-07-19T01:20:18+5:302015-07-19T01:20:18+5:30
जर्मनीसारख्या प्रगत देशात आयुर्वेदाचे पंचतारांकित पंचकर्म केंद्र्र बॅडअेम्स येथे नदीकिनारी कार्यरत आहे. अमेरिकेत लँकेस्टर येथे सुमारे दोनशे एकरच्या व्हिलामध्ये पंचक र्म उपचार दिले जातात.
आयुर्वेद हे भारतीय वैद्यकशास्त्र आज जगभर झपाट्याने प्रसार पावत आहे. आयुर्वेदातील स्वस्थ व्यक्तीचे स्वास्थ्य टिकवून ठेवणारी प्रतिबंधात्मक तत्त्वप्रणाली, दीनचर्या, रात्रीचर्या, ऋतुचर्या, आहार-विहार यांचे मार्गदर्शन शुद्ध स्वरूपातील निर्धोक वनौषधी चिकित्सा, पंचकर्म उपचार पद्धतीसारखी प्रभावी आणि तत्काळ उपयुक्तठरणारी चिकित्सक यामुळे पाश्चात्त्य देशातील जनता आयुर्वेदाकडे आकर्षित होत आहे.
जर्मनीसारख्या प्रगत देशात आयुर्वेदाचे पंचतारांकित पंचकर्म केंद्र्र बॅडअेम्स येथे नदीकिनारी कार्यरत आहे. अमेरिकेत लँकेस्टर येथे सुमारे दोनशे एकरच्या व्हिलामध्ये पंचक र्म उपचार दिले जातात. ‘अमेरिकन हार्ट असोसिएशन’ने नुकतेच हृदयविकार प्रतिबंधासाठी आयुर्वेदाचे सिद्धान्त संशोधनातून मान्य केले आहेत.
१९८०च्या दशकात महर्षी महेश योगी यांनी भावातीत ध्यान पद्धतीबरोबरच आयुर्वेदाची पाश्चात्त्य जगताला ओळख करून दिली. आयुर्वेदातील मूलभूत सिद्धान्त विज्ञानाच्या कसोटीवर तावून सुलाखून घेऊन पाश्चात्त्यांच्या धाटणीत ‘महर्षी आयुर्वेद’ या नावाने सादर केला. आज जगातील १४४ देशांत महर्षी आयुर्वेदाची केंद्रे आहेत. शरीरासाठी आयुर्वेद, मनासाठी भावातीत ध्यान अशी तत्काळ लाभदायी पद्धती असल्याने अनेक पाश्चात्त्य डॉक्टर्स महर्षी आयुर्वेदाचे परीक्षण घेऊन गेली २५-३० वर्षे कार्यरत आहेत. डॉ. रॉबर्ट श्नायडर (अमेरिका) डॉ. रॉबर्ट किथ वालेस, डॉ. नॉन्सी लॅन्सडॉर्क, डॉ. स्टुअर्ट स्ट्रासेनबर्ग, डॉ. हरी शर्मा (अमेरिका), डॉ. आॅलिव्हर वर्नर (स्वित्झरर्लंड), डॉ. कारेन पिर्क (जर्मनी), डॉ. वुल्फगॅग (आॅस्ट्रिया), डॉ. वॉल्टर मॉल्क, डॉ. राईन हार्ड पिचा, डॉ. योर गुगलीमीन (इटली) ही काही अघाडीची नावे जी मंडळी आयुर्वेदाचा प्रसार, प्रचार त्यांच्या त्यांच्या देशात करीत आहेत. महर्षी आयुर्वेदावर जगभरातल्या असंख्य विद्यापीठांमधून पद्धतशीर संशोधन सुरू आहे. हजारो वर्षांपूर्वी सांगितलेले सिद्धान्त पाश्चात्त्य डॉक्टर्स नव्याने सिद्ध करून दाखवीत आहेत. हृदयरोगापासून कॅन्सरपर्यंत आणि मनोविकारांपासून ते अस्थिरोगांपर्यंत महर्षी आयुर्वेद गुणकारी ठरतो आहे. महर्षी महेश योगी यांनी तीन दशके युरोपात राहून ध्यान पद्धती आणि महर्षी आयुर्वेदाच्या प्रचार-प्रसार केला आहे. त्याची फळे चाखावयाची असतील तर आयुर्वेद हा पातळ होऊ न देता सवंग न बनविता आयुर्वेदाच्या पदवीधरांनी सामन्यांपर्यंत पोहोचविला पाहिजे.
आज जर्मनीसारख्या प्रगत देशात महर्षी आयुर्वेदाचे पंचतरांकित पंचकर्म केंद्र्र बॅडअेम्स येथे नदीकिनारी कार्यरत आहे. अमेरिकेत लँकेस्टर येथे सुमारे दोनशे एकरच्या व्हिलामध्ये पंचक र्म उपचार दिले जातात, तर फेअरफिल्ड आयोवा येथे ‘महर्षी युनिव्हर्सिटी आॅफ मॅनेजमेंट’ येथे आयुर्वेदाचे प्रशिक्षण दिले जाते. ‘अमेरिकन हार्ट असोसिएशन’ने नुकतेच हृदयविकार प्रतिबंधासाठी महर्षी आयुर्वेदाचे सिद्धान्त संशोधनातून मान्य केले आहेत.
आयुर्वेद पदवीधरांना पाश्चात्त्य
देशात आयुर्वेद तज्ज्ञ म्हणून काम करण्याची मोठी संधी आहे. वनौषधी विद्यापीठ संस्थेच्या माध्यमातून आम्ही मॉरिशस, मलेशिया, थायलंड, दुबई, सिंगापूर, श्रीलंका, सर्बिया येथे पॅनासिया आंतरराष्ट्रीय परिषद घेतल्या आहेत. कोल्हापूर येथे डिसेंबर २०१४मध्ये जगभरातील ११ देशांचे प्रतिनिधी आयुर्वेद परिषदेसाठी आले होते. रोटमंड-नेदरलँड येथे एप्रिल १५मध्ये पहिली आंतरराष्ट्रीय आयुर्वेद काँग्रेस संपन्न झाली. त्यात ५५ देशांतील ५५० आयुर्वेद डॉक्टर्सनी हजेरी लावली होती. एकंदरीत काय जगभर आयुर्वेदाच्या प्रसाराला मोठा वाव आहे.