आयुर्वेदाला हवी आधुनिक तंत्रज्ञानाची जोड - नितीन गडकरी
By admin | Published: October 4, 2015 02:58 AM2015-10-04T02:58:44+5:302015-10-04T02:58:44+5:30
आयुर्वेदाला जगन्मान्यता मिळवून देण्यासाठी त्यावर संशोधन होणे गरजेचे आहे. आयुर्वेदाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन त्याची परिणामकारकता आणखी वाढवता येऊ शकते, असे
नागपूर : आयुर्वेदाला जगन्मान्यता मिळवून देण्यासाठी त्यावर संशोधन होणे गरजेचे आहे. आयुर्वेदाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन त्याची परिणामकारकता आणखी वाढवता येऊ शकते, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालयाला ५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल सुवर्ण महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. याचे उद्घाटन शनिवारी सकाळी महाविद्यालयाच्या सभागृहात थाटात पार पडले. या कार्यक्रमात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. गडकरी म्हणाले, आपल्याकडे आयुर्वेदाचे भरपूर ज्ञान आहे. पण त्यामध्ये संशोधन झालेले नाही. आपण गुणात्मक बदल करीत नसल्याने आयुर्वेदाला मर्यादा येतात. यासाठी आपली क्षमता, काम करण्याच्या पद्धतीत गुणवत्ता वाढविण्याची गरज आहे. आयुर्वेदातून मोठा रोजगार मिळू शकतो. आयुर्वेदाकडे परकीय चलन मिळवून देणारे एक महत्त्वाचे साधन म्हणून पाहिले गेले पाहिजे, असे सांगून ते म्हणाले, माझा आयुर्वेद व होमिओपॅथीवर विश्वास आहे. या पॅथीच्या डॉक्टरांनीही आपल्या पॅथीवर विश्वास ठेवून संशोधन केल्यास मोठी उपलब्धी मिळू शकते. याचे अनेक उदाहरणं आहेत.
पुरंदरे-गडकरी यांची भेट : नितीन गडकरी यांनी शुक्रवारी आपल्या निवासस्थानी इतिहासकार बाबासाहेब पुरंदरे यांचा सत्कार केला. या वेळी सुमारे दीड तास पुरंदरे यांनी गडकरी कुटुंबीयांशी चर्चा केली. पुरंदरे यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलण्यास मात्र नकार दिला.