Azaan Loudspeaker Issue : महाराष्ट्र सरकारचंही ठरलं...; अजानसंदर्भात शिवसेना नेते संजय राऊत यांचं मोठं वक्तव्य
By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2022 06:00 PM2022-04-07T18:00:47+5:302022-04-07T18:02:46+5:30
खरे तर, कर्नाटकात हिंदू संघटनांनी मशिदींवरील लाउडस्पीकर काढण्याची मागणी केली होती. यानंतर सरकारनेही त्यांच्या या मागणीचे समर्थन केले होते.
कर्नाटकातील मशिदींमधील लाउडस्पीकरचा आवाज मोजण्यासाठी मशीन लावण्यावरून जबरदस्त राजकारण सुरू झाले आहे. महाराष्ट्रातही मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील लाउडस्पीकर काढण्याची मागणी केली आहे. तसेच, हे लाउडस्पीकर काढण्यात आले नाही, तर हिंदू मशिदींसमोर मोठ्या आवाजात हनुमान चालिसा म्हणतील, असा इशाराही राज ठाकरे यांनी दिला होता. यासंदर्भात शिवसेना नेते संजय राऊत यांना पत्रकारांनी विचारले असता, महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनीही एक नोटीस जारी केली आहे. यात, आजानच्या वेळी लाउडस्पीकरच्या आवाजाचा स्तर किती डेसिबल असावा, हे सांगितले असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
#WATCH | Maharashtra Home Minister has also issued a notice stating how much Decibel level should be there while observing Azaan, says Shiv Sena leader Sanjay Raut on 'Azaan loudspeaker' issue pic.twitter.com/MRaKMDWwse
— ANI (@ANI) April 7, 2022
मशिदींमध्ये लागणार आवाज मोजण्याचं मशीन -
खरे तर, कर्नाटकात हिंदू संघटनांनी मशिदींवरील लाउडस्पीकर काढण्याची मागणी केली होती. यानंतर सरकारनेही त्यांच्या या मागणीचे समर्थन केले होते. मात्र, याच बरोबर कायद्यानुसार कार्यवाही होईल, असेही सरकारने म्हटले होते. यानंतर कर्नाटक सरकारने सर्वच मशिदींना नोटीस बजावली आहे. यानंतर आता कर्नाटकात आवाज मोजणारे मशीन लावण्याची तयारीही सुरू झाली आहे.
पोलिसांनीही पाठवली नोटीस -
कर्नाटक पोलिसांनीही यासंदर्भात मशिदींना नोटीस बजावली आहे. यात लाउडस्पीकरचा आवाज परवानगी असलेल्या डेसिबलच्या आत असावा, असे सांगण्यात आले आहे. विशेष म्हणजे, एकट्या बेंगळुरूतील जवळपास 250 मशिदींना अशा प्रकारची नोटीस बजावण्यात आली आहे. या सर्व मशिदींच्या लाउडस्पीकरचा आवाज नियमांपेक्षा मोठा असल्याचे आढळून आले होते. यानंतर आता अधिकाऱ्यांनी मशिदींमध्ये असे उपकरण लावायला सुरुवात केली आहे, जे आवाज परवानगी असलेल्या पातळीपर्यंतच ठेवतील.
तसेच, महाराषट्रातही राज ठाकरे यांनी गुढीपाडव्यानिमित्त 2 एप्रीलला मुंबईतील दादरच्या शिवाजी पार्क मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत मशिदींवरील लाउडस्पीकर काढण्यासंदर्भात भाष्य केले होते.