बी आणि सी वॉर्ड - प्रभाग सरकले...इच्छुकांमध्ये रस्सीखेच

By Admin | Published: January 30, 2017 09:46 PM2017-01-30T21:46:23+5:302017-01-30T21:46:23+5:30

फेररचनेमुळे शहराला मोठा धक्का बसला. यात बी आणि सी प्रभागच हलला आहे

B and Sea Ward - The wardrobe scattered ... Rookie likes | बी आणि सी वॉर्ड - प्रभाग सरकले...इच्छुकांमध्ये रस्सीखेच

बी आणि सी वॉर्ड - प्रभाग सरकले...इच्छुकांमध्ये रस्सीखेच

googlenewsNext

मुंबई: फेररचनेमुळे शहराला मोठा धक्का बसला. यात बी आणि सी प्रभागच हलला आहे. ए वॉर्डमधील दोन प्रभाग बी वॉर्डमध्ये सरकले असून सीमध्येही हीच अवस्था आहे. शहरातून एक सात प्रभाग गायब झाले आहेत. याचा धक्का ए, बी आणि सी वॉर्डला समान बसला आहे. यामुळे या प्रभागांमध्ये इच्छुकांमध्ये जोरदार रस्सीखेच आहे. मेट्रोच्या मुद्दावर आक्रमक राहिल्याने येथील मराठीबहुल भागातून शिवसेनेला फायदा मिळू शकेल. मात्र इच्छुक अधिक असल्याने बंडखोरीचा सामना करावा लागणार आहे.
शहर भागामधील लोकसंख्या गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात उपनगरामध्ये स्थलांतरीत झाली आहे. यामुळे बी वॉर्डमध्ये ५४ हजार आणि सी वॉर्डमध्ये ५७ हजार लोकसंख्या उरली आहे. लोकसंख्येत घट झाल्यामुळे बी आणि सी वॉर्डमधून प्रत्येकी एक प्रभाग कमी करण्यात आला आहे. त्यामुळे बी वॉर्डमध्ये आता दोनच नगरसेवक उरले आहेत. तर सी वॉर्डमध्ये तीन प्रभाग उरले आहेत. फेररचनेमुळे प्रभागांच्या सीमाही सरकल्यामुळे येथील नगरसेवकांसमोरील अडचणी वाढल्या आहेत. त्यामुळे आपली राजकीय कारर्कीद वाचविण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांच्या इच्छुकांना येथे पायपीट करावी लागणार आहे.
बी वॉर्डमध्ये काँग्रेसचे ज्ञानराज निकम आणि वकारुन्नीसा अन्सारी यांचे प्रभाग सी वॉर्डमध्ये सरकले आहेत. तर शिवसेनेचे गणेश सानप आणि काँगे्रसचे जावेद जुनेजा यांच्या प्रभागाचा काही भाग बी वॉर्डमध्ये आला आहे. तर सी वॉर्डमध्ये एक प्रभाग उडाला आहे. बेकायदा बांधकामं व फेरिवाल्यांचा विळखा असलेल्या बी वॉर्डमध्ये नागरी सुविधांचाही अभाव आहे. मात्र या वॉर्डमध्ये काँग्रेसचे वर्चस्व असल्याने शिवसेनेला या ठिकाणी तगडा उमेदवार द्यावा लागणार आहे.
...................................................................
वॉर्ड सी
प्रभाग क्रमांक : २२०
खुला
लोकसंख्या : ५४४१८
अनुसूचित जाती : ८५९
अनुसूचित जमाती : ९३
कामाठीपुरा, नळबाजार, गुलालवाडी

प्रभाग क्रमांक : २२१
खुला
लोकसंख्या : ५७१४१
अनुसूचित जाती : २५०
अनुसूचित जमाती : ८७
विठ्ठलवाडी, झवेरी बाजार, फणसवाडी, भुलेश्वर, लोहार चाळ,

प्रभाग क्रमांक : २२२
इतर मागासवर्ग (महिला)
लोकसंख्या : ५४६०२
अनुसूचित जाती : ११९९
अनुसूचित जमाती : १९८
धोबी तलाव, सोनापूर, चंदनवाडी, जिमखाना, ठाकूरद्वार, चेऊलवाडी
...................................................................
वॉर्ड बी
प्रभाग क्रमांक : २२३
खुला (महिला)
लोकसंख्या : ३०४५
अनुसूचित जाती : ४७८०
अनुसूचित जमाती : ७५९
उमरखाडी, दानाबंदर, प्रिन्सेस डॉक, वाडीबंदर

प्रभाग क्रमांक : २२४
इतर मागासवर्ग (महिला)
लोकसंख्या : ६४२४५
अनुसूचित जाती : ५५८
अनुसूचित जमाती : ३३०
व्हिक्टोरिया डाक्स, बेंगालीपूरा, कोळीवाडा, मांडवी, पायधूनी
..................................................................
महापालिका २०१२ च्या निवडणुकीप्रमाणे विजयी उमेदवार
प्रभाग २१७
विजयी उमेदवार : युगंधरा साळेकर - ५९६४
पराभूत उमेदवार : प्रीती कुडाळे - ४८०९

प्रभाग २१८
विजयी उमेदवार : संपत ठाकूर - ६७०१
पराभूत उमेदवार : राकेश काळे - ३४९०

प्रभाग २१९
विजयी उमेदवार : वीणा जैन
पराभवी उमेदवार : स्वीटी संघवी


प्रभाग २२०
विजयी उमेदवार : याकूब मेमन - ६४७५
पराभूत उमेदवार : नदीन सलीम चोहान - ६३३३
प्रभाग २२१
विजयी उमेदवार : ज्ञानेश्वर निकम - ७४८९
पराभूत उमेदवार : अमित साखरकर - ५३७६

प्रभाग २२२
विजयी उमेदवार : वकारउनीसा अन्सारी : ५१६६
पराभूत उमेदवार : सईदा मर्चंट : २६००

प्रभाग २२३
विजयी उमेदवार : जावेद जुनेजा - ४८८४
पराभूत उमेदवार : शोभन परवीन - ३२७२

प्रभाग २२४
विजयी उमेदवार : गणेश सानप - ५८७०
पराभूत उमेदवार : शिवकुमार साहू - ४३९९
...................................................................

Web Title: B and Sea Ward - The wardrobe scattered ... Rookie likes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.