बी. डी. शिंदे यांचे निधन
By admin | Published: September 9, 2015 01:04 AM2015-09-09T01:04:15+5:302015-09-09T01:04:15+5:30
राजपत्रित अधिकारी महासंघाच्या संस्थापकांपैकी एक आणि महसूल कर्मचारी संघटनेचे नेते बी. डी. उपाख्य बाळासाहेब शिंदे (७५) यांचे मंगळवारी येथे निधन झाले. गेले
मुंबई : राजपत्रित अधिकारी महासंघाच्या संस्थापकांपैकी एक आणि महसूल कर्मचारी संघटनेचे नेते बी. डी. उपाख्य बाळासाहेब शिंदे (७५) यांचे मंगळवारी येथे निधन झाले. गेले काही दिवस त्यांच्यावर उपचार सुरू होते.
शिंदे हे अखेरपर्यंत कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांसाठी संघर्षरत राहिले. सोलापूर जिल्ह्यातील मोहोळचे असलेले शिंदे यांनी आपली शासकीय सेवेची कारकीर्द तहसीलदार म्हणून सुरू केली. काही वर्षे सातारा जिल्ह्णात नोकरी केल्यानंतर ते मुंबईत आले. सिडको, एमटीडीसी आदी ठिकाणी काम केल्यानंतर ते मंत्रालयात रुजू झाले.
तत्कालिन मुख्यमंत्री बॅ. ए. आर. अंतुले यांचे ते खासगी सचिव होते. रामराव आदिक, भाई सावंत या तत्कालिन मंत्र्यांचे खासगी सचिव, मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना त्यांच्या कार्यालयात उपसचिव म्हणून त्यांनी काम पाहिले. शिंदे यांच्यावर मंगळवारी चेंबूर येथे शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. (प्रतिनिधी)