बी. आर. खेडकरांना पद्मश्री द्यावा!

By admin | Published: July 11, 2014 11:52 PM2014-07-11T23:52:30+5:302014-07-11T23:52:30+5:30

देशभरातील महापुरुषांची शिल्पे घडविणारे शिल्पकार बी. आर. खेडकर यांना पद्मश्री पुरस्काराने गौरविले पाहिजे.

B R. Khedkar should give Padma Shri! | बी. आर. खेडकरांना पद्मश्री द्यावा!

बी. आर. खेडकरांना पद्मश्री द्यावा!

Next
पुणो : देशभरातील महापुरुषांची शिल्पे घडविणारे शिल्पकार बी. आर. खेडकर यांना पद्मश्री पुरस्काराने गौरविले पाहिजे. केंद्र शासनाकडे त्याविषयीची शिफारस राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे करण्यात येणार आहे, असे आश्वासन राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आज दिले. 
राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आयोजित गुरुजन गौरव समारंभात शिल्पकार बी. आर. खेडकर, डॉ. ह. वि. सरदेसाई, अर्नावाझ दमानिया, पंडित सुरेश तळवलकर व सहकाररत्न आबासाहेब शिंदे यांचा सत्कार तटकरे यांच्या हस्ते करण्यात आला. त्या वेळी आमदार जयदेव गायकवाड, अनिल भोसले, कमल ढोले पाटील, स्थायी समिती अध्यक्ष बापूराव कण्रे, सभागृह नेते सुभाष जगताप, म. वि. अकोलकर, नगरसेवक अप्पा रेणुसे, विशाल तांबे व अभय मांढरे आदी उपस्थित होते. शिल्पकार खेडकर यांना अनेक पुरस्काराने गौरविण्यात आले. त्यांना देशातील सर्वोच्च अशा पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात यावे, अशी मागणी अप्पा रेणुसे यांनी केली. त्यावर तटकरे म्हणाले, समाजातील गुरुजनांपुढे नतमस्तक झाले पाहिजे. गुरुजनांनी समाजाला दिशा दिली आहे. खेडकर यांनी महापुरुषांची शिल्पे घडविली आहेत. त्यांना पद्मश्रीने गौरविण्यासाठी केंद्र शासनाकडे शिफारस करण्याचा आमचा प्रयत्न राहील. सुरेश तळवलकर म्हणाले, संगीतक्षेत्रत आजही गुरु-शिष्याची परंपरा कायम आहे. गुरुजनांचा सन्मान हीच ती परंपरा आहे. (प्रतिनिधी)
 
4गुरुजनांच्या सत्कारासाठी नागरिकांना 3.3क् वाजता बोलविले होते. त्यानुसार नागरिक वेळेवर उपस्थित होते. परंतु, मला आयोजकांनी 5 वाजता वेळ दिली होती. त्यामुळे उशिरा आल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. यापुढे असे होणार नाही. सध्या प्रत्येक गोष्ट नाजूकपणो हाताळावी लागत आहे, अशी मिश्कील टिपण्णी करीत ते म्हणाले, पक्षाचा प्रदेशाध्यक्ष म्हणून यापुढे वेळीची निश्चित काळजी घेईन.  

 

Web Title: B R. Khedkar should give Padma Shri!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.